Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्या : समिती नेते रामचंद्र मोदगेकर यांची निवेदनाद्वारे खा. धैर्यशील माने यांच्याकडे मागणी

  बेळगाव : मुंबई येथील मंत्रालयामध्ये सीमा कक्षाच्या सभागृहात तज्ञ समितीची विशेष बैठक 10 सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीप्रसंगी सीमा भागातील कार्यकर्त्यांनी निवेदन देत सीमाप्रश्नी ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती केली. यावेळी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे उपाध्यक्ष व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र …

Read More »

‘मानस कराटे ॲकॅडमी’चे कोलकात्ता राष्ट्रीय स्पर्धेत यश

  बेळगाव : बेळगावच्या ‘मानस कराटे स्पोर्ट्स ॲकॅडमी’च्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकदार कामगिरी करत बेळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. पश्चिम बंगालमधील कोलकात्ता येथे ‘जे.एस.एस.के.’ संस्थेतर्फे आयोजित ‘ओपन नॅशनल कराटे’ स्पर्धेत देशभरातील ६०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह, नेपाळ, ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ …

Read More »

श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय निवड

  बेळगाव : दि. 10/09/2025 रोजी जिल्हा क्रिडांगण नेहरू स्टेडियम येथे बेळगाव तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेमध्ये कु. श्रेयश चांगळी ह्याने 80 मी अडथळा सपर्धेमध्ये प्रथम क्रमांक, कु. सिद्धी कुगजी हिने 3000 मी. धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावला व विनायक बिर्जे उंच उडीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. कुस्ती स्पर्धेत अक्षरा गुरव हिने 54 …

Read More »

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार!

  बेळगाव : शिवाजीनगर, बेंगळूर मेट्रो स्थानकाचे नाव सेंट मेरी मेट्रो स्थानक असे करण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. सदर निर्णयाला कर्नाटकातून तीव्र विरोध होत आहे. शिवाजीनगर स्थानकाचे नाव सेंट मेरी असे न करता छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्थानक असे नामकरण करण्यात यावे या मागणीसाठी श्रीराम सेना हिंदूस्थानकडून येत्या सोमवारी …

Read More »

उप्पीट खाल्ल्याने निवासी शाळेतील विद्यार्थी अत्यवस्थ : दोघांची प्रकृती गंभीर

  चिक्कोडी : नाश्त्यात उप्पीट खाल्ल्याने मोरारजी देसाई निवासी शाळेतील विद्यार्थी अत्यवस्थ झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. बेळगावमध्ये चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेत ही घटना घडली. सकाळी नाश्त्यात विद्यार्थ्यांना उप्पीट देण्यात आले. उप्पीट खाल्ल्यानंतर काही वेळातच ३० विद्यार्थी अत्यवस्थ झाले. अत्यवस्थ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

कित्तूरमधील डीसीसी बँकेच्या शाखेसमोर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; सचिवाच्या अपहरणाचा प्रयत्न…

  बेळगाव : बेळगाव डीसीसी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे निवडणूक मैदानाचे रणांगणात रूपांतरित होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली आणि कित्तूरमधील डीसीसी बँकेच्या शाखेसमोर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. काँग्रेस सदस्यांची संख्या कमी असल्याने निवडणूक ठराव …

Read More »

अल्पसंख्याक वसाहतींच्या विकासासाठी ३९८ कोटी

  मंत्रिमंडळाचा निर्णय; रामदुर्ग, सौंदत्ती तालुका रुग्णालयांचे नूतनीकरण बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने राज्यातील २२ विधानसभा मतदारसंघांमधील अल्पसंख्याक वसाहतींच्या विकासासाठी एकूण ३९८ कोटी रुपयांच्या अनुदानाला मान्यता दिली आहे. विजयपुर विमानतळाचे काम, आरोग्य क्षेत्राची सुधारणा आणि रस्ते संपर्क सुधारणेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग आणि सावदत्ती तालुका रुग्णालयांच्या नूतनीकरणासाठी …

Read More »

सी. टी. रवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

  मद्दूर गणेश विसर्जनात ‘प्रक्षोभक’ भाषण बंगळूर : मद्दूर येथील गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक विधाने केल्याच्या आरोपावरून भाजप नेते आणि आमदार सी. टी. रवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्दूर पोलीस उपनिरीक्षकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून सी. टी. रवीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे कळते. तक्रारीच्या आधारे, वेगवेगळ्या समुदायांमध्ये द्वेष …

Read More »

बेळवट्टी येथे महालक्ष्मी सोसायटीची १९ वी सभा खेळीमेळीत

  बेळगाव : बेळवट्टी – बकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचा १९ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन बी. बी. देसाई होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मनोहर सांबरेकर, मारुती कांबळे, अर्जुन पाटील, सातेरी चांदीलकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. …

Read More »

‘येळ्ळूर फलक’ खटला प्रकरण : ४२ जणांची निर्दोष मुक्तता!

  बेळगाव : सीमा लढ्यात अग्रस्थानी असलेले येळ्ळूर गाव. येळ्ळूर येथील “महाराष्ट्र राज्य” फलक हटविल्याच्या पार्श्वभूमीवर गावात अशांतता निर्माण झाली होती. या प्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्या पैकी खटला क्रमांक 125 मधील 42 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्याकडे बेळगावसह संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागून राहिले होते. 2014 …

Read More »