Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

भाजप आमदाराचा प्रताप…! भगवान श्रीरामांच्या मूर्तीवर पाय ठेवून केलं अभिवादन

  बिदर : रामनवमीच्या दिवशीच प्रभू श्री रामचंद्रांचा अवमान केल्याबद्दल कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारावर जोरदार टीका होत आहे. बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरणू सलगर भगवान रामाच्या मूर्तीवर चढून पुष्पहार अर्पण करताना दिसतात. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर …

Read More »

शहापूर बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने

  बेळगाव : बेळगावच्या शहापूरमधील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बसवण्णा देवाची यात्रा भक्तिभावाने पार पडली. शहापूर खडेबाजारमधील प्राचीन बसवण्णा महादेव देवाची वार्षिक यात्रा शुक्रवारी सायंकाळी भक्तिभावाने पार पडली. यानिमित्तदिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हजारो भाविकांनी दिवसभर मंदिरात श्रीफळ, फुले, कापूर, उदबत्त्या आदी पूजा साहित्य घेऊन दर्शनासाठी गर्दी …

Read More »

राज्यात काँग्रेसचा विजय निश्चित : ऍड. चंद्रहास अणवेकर यांचा विश्वास

बेळगाव   40 टक्के कमिशन सरकार अशी प्रतिमा बनलेल्या भाजप सरकारला जनता विटली आहे. जनतेच्या काँग्रेस प्रति आशा वाढल्या आहेत.त्यामुळे या वेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष कर्नाटक राज्यात सत्तेवर येईल. त्याचबरोबर बेळगाव दक्षिण बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे, असा विश्वास कर्नाटक प्रदेश काँग्रेस ओबीसी विंगचे राज्य उपाध्यक्ष …

Read More »

रामनवमी निमित्त श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य शोभायात्रा; भगवेमय वातावरण

  बेळगाव : हत्ती-घोडे, बैलगाड्यांसह ढोलताशांच्या गजरात रामनवमीनिमित्त बेळगावात आज श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या मिरवणुकीत हजारो रामभक्तानी जल्लोषात सहभाग घेतला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला बेळगावात आज अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे शहरात श्रीराम, रामभक्त हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वगुरू बसवण्णा यांच्या …

Read More »

आता लक्ष उमेदवार यादींकडे; सर्वच पक्षांच्या उमेदवार निवड प्रक्रीयेला वेग

  इच्छुकांचे जोरदार लॉबिंग बंगळूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राज्यातील काँग्रेस, भाजप व धजद पक्ष आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती देत आहेत. यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, ईच्छुक उमेदवारांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून राजकीय क्षेत्रात औत्सुक्य वाढले आहे. कॉंग्रेस, …

Read More »

शिवकुमार यांच्या महत्त्वाकांक्षेची अडचण नाही, पण मुख्यमंत्री पदासाठी…; सिद्धरामय्यांचा दावा

  बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. कर्नाटकात विधानसभेच्या २२४ जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी ११३ हा जादुई आकडा गाठावा लागणार आहे. राजकीय समीकरणे ही राज्यातील विभागांप्रमाणे वेगवेगळी आहेत. मात्र काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत सुरू झाली असून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधान केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी …

Read More »

बेळगावात रामनवमी भक्तिभावाने साजरी

  बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात आज रामनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात येतीय. यानिमित्त भक्तांनी श्रीराम मंदिरात मनोभावे पूजा करून मर्यादा पुरुषोत्तमाला नमन केले. बेळगाव शहरात आज रामनवमीनिमित्त भक्तिभावाचा पूर ओसंडून वाहात असल्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणच्या श्रीराम मंदिरात आज पहाटेपासूनच अबालवृद्ध भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. बेळगाव शहरातील …

Read More »

‘नवहिंद सोसायटी’च्या चेअरमनपदी प्रकाश अष्टेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे

  येळ्ळूर : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नवहिंद को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. प्रकाश पांडुरंग अष्टेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. अनिल हणमंत हुंदरे यांची निवड करण्यात आली. सदर निवड 1 एप्रिल 2023 ते 30 नोव्हेंबर 2025 या अडीच वर्षांसाठी असणार आहे. 1 एप्रिल 2023 …

Read More »

कर्नाटकात भाजपाला मोठा झटका बसण्याची शक्यता, सर्व्हेत धक्कादायक आकडेवारी समोर

  नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १० मेला मतदान होणार आहे, तर १३ मेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अशात ‘एबीपी न्यूज’चा एक सर्व्हे समोर आला आहे. यात भाजपाचा पराभव होत असून, काँग्रेस सत्तेवर येत असल्याचं दाखवलं आहे. …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक शुक्रवारी

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. मध्यवर्ती म. ए. समितीच्या पदाधिकारी व सभासदांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी यांनी केले आहे.

Read More »