Saturday , June 6 2026
Breaking News

जिव्हाळा फौंडेशनतर्फे पीपीई किटसह अन्य साहित्याची देणगी

Spread the love

 

बेळगाव : जिव्हाळा फौंडेशनतर्फे सेवाभावी संस्था सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फौंडेशनला पीपीई किट, हॅन्ड ग्लास, फेसमास्क व सॅनिटायझर देणगी दाखल देण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

अनगोळकर फौंडेशन आपल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरीब गरजू लोकांच्या मदतीसाठी जे निस्वार्थ कार्य करत असते त्याला हातभार म्हणून जिव्हाळा फौंडेशनतर्फे पीपीई किट, हॅन्ड ग्लास, फेसमास्क व सॅनिटायझर देणगी दाखल देण्यात आले. त्याबाबतची माहिती सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी जिव्हाळा फौंडेशनचे आभार मानले. सदर कार्यक्रमाप्रसंगी जिव्हाळा फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दू, अध्यक्षा डॉ. सुरेखा पोटे, उपाध्यक्षा राजश्री अनगोळ, सेक्रेटरी संजिवनी पाटील, डॉ. रवींद्र अनगोळ, शेखर पाटील, प्रशांत बिर्जे यांच्यासह सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फौंडेशनचे सदस्या प्रेमा पाटील, कीर्ती चौगुले आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षणाचा भार यंदाही अतिथी शिक्षकांवरच; कायमस्वरूपी भरतीकडे दुर्लक्ष

Spread the love  बेळगाव जिल्ह्यात १,६१७ अतिथी शिक्षकांची होणार नियुक्ती बेळगाव : राज्यातील सरकारी शाळांमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *