Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन!

  बेळगाव : हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात गुरुवारी सकाळी कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील नऊ हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. सीमा भागातील कन्नड सक्ती हटावी यासाठी 1 जून 1986 रोजी मोठ्या प्रमाणात …

Read More »

कर्नाटकातील चामराजनगरजवळ हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले, दोन्ही पायलट सुरक्षित

बेंगळूरू : भारतीय हवाई दलाचे सूर्य किरण ट्रेनर विमान गुरुवारी कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्याजवळ कोसळले. चामराजनगर शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बोगापूरा येथील मकाली गावाजवळ ही घटना घडली. “या दुर्घटनेतून एका महिलेसह दोन्ही पायलट सुरक्षित बचावले आहेत. त्यांना बंगळूरला एअरलिफ्ट करण्यात आले आहे,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. IAF चे एक …

Read More »

राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता!

  बेंगळुर : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगळुरू शहर, ग्रामीण, म्हैसूर, चिक्कमंगळूरू, शिमोगा, कोडगु, हासन आणि कोलार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. त्यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडील अनेक भागात पाऊस सुरूच होता आणि पाऊस पडत असलेल्या भागात …

Read More »

विद्यार्थी बसपास अर्ज स्वीकारण्यास ४ जूनपासून सुरुवात

  बेळगाव : परिवहन मंडळाकडून विद्यार्थी बसपास अर्ज स्वीकारण्यास ४ जूनपासून सुरुवात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. वायव्य परिवहन मंडळाकडून बसपास वितरणाची सर्व तयारी पूर्ण केली असून, यंदा प्रथमच स्मार्टकार्डच्या धर्तीवर पीव्हीसी बसपास ऑनलाईन दिले जाणार आहेत. चार्जिंगपासून घरी ऑनलाइन प्रक्रिया सुरू होणार असली तरी स्मार्टकार्डप्रमाणे असणारे बसपास तयार करण्यासाठी …

Read More »

प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

  बेळगाव : बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी काम पाहिलेले आणि सध्या प्रादेशिक आयुक्त म्हणून सेवा बजावत असलेले एम. जी. हिरेमठ यांच्या सेवानिवृत्तीबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पंचायत सभागृहात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना एम. जी. हिरेमठ म्हणाले, शासकीय सेवा म्हणजे आपल्यासाठी देवाचा आशीर्वाद आहे. प्रामाणिकपणा, सकारात्मक दृष्टीकोन …

Read More »

ऍड. नागेश सातेरी यांचा १८ जूनला अमृतमहोत्सव

  बेळगाव : कामगार नेते ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा १८ जूनला साजरा करण्यात येणार आहे. समारंभाला नामवंत लेखक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सोहळा समितीच्या मंगळवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. समितीचे अध्यक्ष प्रा. आनंद …

Read More »

बेळगावमध्ये आंतरराष्ट्रीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन

  बेळगाव : कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनच्या वतीने बेळगावमध्ये के एल ई जिरगे हॉल येथे ९ ते ११ जून या कालावधीत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या तसेच पब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक एच.आर. रंगनाथ हे असणार आहेत. आज …

Read More »

बीम्सला आमदार राजू सेठ यांची भेट

  बेळगाव : बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची सूचना करून सरकारकडून आवश्यक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले. बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजू सेठ यांनी जोमाने कामाला …

Read More »

रेशन तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बाची या गावात रेशन तांदळामध्ये प्लास्टिक तांदूळ आढळून आला असून लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. बेकायदेशीर रित्या बीपीएल कार्डचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांविरोधात कडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र अलीकडे रेशन तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदूळ आढळत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्लास्टिकचा तांदूळ वितरित करून …

Read More »

जायंट्स मेनच्या वतीने तंबाखू विरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन

  बेळगाव : संपूर्ण जगभरात सिगारेट, मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे जणू आता शरीराच्या सवयीचा भाग झाला आहे. कोणी तणावमुक्त जगण्यासाठी तर कोणाच्या जीवनात वाईट प्रसंग घडल्यावर, कोणी अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतो आणि त्याची चटक लागली की त्या व्यसनाच्या आहारी जातो. खासकरून तंबाखू सेवन सिगारेट आणि गुटखा …

Read More »