Monday , December 23 2024
Breaking News

LOCAL NEWS

रोटरी मिडटाऊनतर्फे समितीच्या कोविड सेंटरला जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

बेळगाव : मराठा मंदिर येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आयसोलेशन कोविड केअर सेंटरला रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आल्या.रोटरी मिडटाऊनचे अध्यक्ष अशोक कोळी, सचिव नागेश मोरे, रोटेरियन प्रकाश डोळेकर, संतोष नाईक आदींनी समितीच्या कोविड केअर सेंटरला तांदूळ, तेल, तूरडाळ, साखर, चहा पावडर, साबण आदी साहित्य कोविड केअर सेंटरचे संचालक …

Read More »

संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज

बेळगाव : मागील दोन वर्षांचा अनुभव बघता यावर्षीही जनतेला पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे त्यासाठी प्रशासन पूर्व तयारीला लागले असून 500 निवारा केंद्रे स्थापन करण्यात येणार असून तालुका निहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. वास्तविक दरवर्षी 100 च्या आसपास निवारा केंद्र उभारण्यात येतात पण सध्याच्या कोरोनाच्या काळात पूरग्रस्तांना दाटीवाटीने …

Read More »

बस तिकीट दरवाढ नाही : परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी

बेंगळुरू : कोरोना लॉकडाऊनच्या ओझ्याखाली दबलेल्या जनतेत आता दुसरे ओझे उचलायची ताकद राहिलेली नाही. त्यामुळेच राज्यात बस तिकीट दरात वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.बंगळुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी सध्या सरकार बस तिकीट दरात कोणतीही वाढ करणार नसल्याचे स्पष्ट केले. गरीब व जनसामान्यच …

Read More »

माजी मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार सी. एम. उदासी यांचे निधन

बेंगळुरू : माजी मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ आमदार सी. एम. उदासी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.बंगळूरच्या नारायण हृदयालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचाराचा फायदा न होता त्यांचे निधन झाले. हावेरी जिल्ह्यातील हनगल मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. हावेरीचे खासदार शिवकुमार उदासी हे त्यांचे पुत्र होत.मुख्यमंत्री बी. एस. …

Read More »

आरसीयुतर्फे कोरोना जागृती, फूडकीट्सचे वाटप

बेळगाव : बेळगावच्या आरसीयु अर्थात राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्ययन पीठातर्फे कलारकोप्प गावात कोरोना जागृती आणि फूड कीट्सचे वाटप करण्यात आले. कोविड -१९ महामारीमुळे संकटात सापडलेल्या भूतरामनहट्टी, बेन्नाळी आणि कलारकोप्प गावातील सुमारे ३०० कुटुंबाना फूड किट्स वाटण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत कार्यवाह राघवेंद्र …

Read More »

कर्नाटक सीईटी परीक्षा २८,२9 ऑगस्टला

बेंगळुरू : अभियांत्रिकीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दिली आहे.दरम्यान सीईटी परीक्षा २८ आणि २९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. प्रत्येक विषयात ६० गुण असतील,” असे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी मंगळवारी …

Read More »

नेताजी मल्टीपर्पज सोसायटीच्यावतीने सोसायटीचे संस्थापक सदस्य व येळ्ळूर ग्रामपंचायत सदस्य महेश कानशिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

येळ्ळूर : स्व. महेश कानशिडे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना चेअरमन डी. जी. पाटील व व्हाईस चेअरमन रघुनाथ मुरकुटे, बाजूला प्रा. सी. एम. गोरल, भरतकुमार मुरकुटे, सी. एम. उघाडे, डॉ. कुलदीप लाड, किरण गिंडे, परशराम गिंडे, शंकर मुरकुटे, दीपक हट्टीकर आदी. येळ्ळूर : येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीचे संस्थापक सदस्य व …

Read More »

जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी जपली सामाजिक बांधीलकी!

बेळगाव : सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन अशा परिस्थितीत प्रत्येक जण वेगवेगळ्या मार्गाने आपली सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी पैकी येळ्ळूरचे जि. पं. सदस्य रमेश गोरल आघाडीवर असून सर्वसामान्य नागरिकांसह सेवाभावी संघटनांना उत्स्फूर्त सहाय्य करून ते आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रसंगी आणि …

Read More »

येळ्ळूर प्रवेशद्वारावरील कचऱ्याची उचल

बेळगाव वार्ताच्या बातमीने येळ्ळूर ग्राम पंचायत खडबडून जागेयेळ्ळूर : येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर घाणीचे साम्राज्य पसरले होते त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. रस्त्यावर विखुरलेल्या कचऱ्याची लवकरात लवकर उचल करावी अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली होती. सदर घटनेची बेळगाव वार्ताने दाखल घेत आवाज उठवला आणि अवघ्या तासाभरात येळ्ळूर ग्रामपंचायतीने कचऱ्याची उचल करून …

Read More »

येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य

येळ्ळूर : येळ्ळूर गावच्या प्रवेशद्वारावर नाल्याच्या बाजूला गावातील हेअर सलून व इतर व्यावसायिकांनी कचरा टाकल्याने गावात प्रवेश करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे तर ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कचऱ्याची उचल करावी, अशी गावकऱ्यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.कोविडच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलेले असताना येळ्ळूर गावच्या वेशीतील हे घाणीचे साम्राज्य असलेले विदारक …

Read More »