बेळगाव : कर्नाटक राज्याचे वन मंत्री उमेश कत्ती यांचे काल हृदयविकाराने बेंगळुरू येथे निधन झाले. दरम्यान, आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी (७ सप्टेंबर) रोजी जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
Read More »LOCAL NEWS
मंत्री उमेश कत्ती यांचे निधन
बेंगळुरू : वन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रात्री 10.30 च्या सुमारास उमेश कत्ती घरी कोसळले आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. बंगळुरूच्या डॉलर्स कॉलनीत उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. मंत्र्याला एमएस रामय्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून …
Read More »नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका
बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा झटका आला. बंगळुरूमधील डॉलर्स कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी रात्री १० वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ एम. एस. रामय्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
Read More »जुन्या कपिलेश्वर गणेश विसर्जन तलावात शिरले दूषित पाणी
किरण जाधव यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा बेळगाव : महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे कपिलेश्वर तलावात दूषित पाणी मिसळल्यामुळे भाविकांना गणपती विसर्जनाला अडथळा निर्माण झाला होता. कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव श्री. किरण जाधव यांच्या निदर्शनास ही बाब येताच किरण जाधव हे स्वतः कपिलेश्वर तलावाकडे जाऊन आणि भाविकांना जक्कीनहोंडा येथे गणपती विसर्जन करण्याची विनंती …
Read More »मुस्लिम स्मशानभूमीसाठी अलारवाड ग्रामस्थांची निदर्शने
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील अलारवाड गावातील मुस्लिम समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलन छेडले. तातडीने जागा उपलब्ध करून न दिल्यास यापुढे मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून निषेध नोंदवण्याचा इशारा त्यांनी दिला. अलारवाड गावातील मुस्लिम समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी नाही. आतापर्यंत एका खासगी …
Read More »सीमाभागातील रस्त्यांसाठी १७० कोटींचे अनुदान
आ. श्रीमंत पाटील : पांडेगाव येथे जलजीवन योजनेचे उद्घाटन अथणी (प्रतिनिधी) : सीमाभागातील रस्त्यांसाठी 170 कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. सर्वच रस्त्यांचे डांबरीकरण पूर्णत्वाकडे असून तालुक्याला जोडणारे सर्व ग्रामीण रस्ते गुळगुळीत करण्याचा आपला ध्यास आहे असे मनोगत माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले. पांडेगाव (ता. अथणी) …
Read More »हा माझा धर्म पशू बचाव दलतर्फे मंगळा गौरी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात
बेळगाव : दि. 4 सप्टेंबर 2022 रोजी गणेश चतुर्थीचे औचित्य साधून, मंगळा गौरी पुजेनिमित्त हा माझा धर्म पशू बचाव दलतर्फे मंगळा गौरी झिम्मा फुगडी स्पर्धा घेण्यात आल्या. आपली लोककला जी लोप पावत चालली आहे, लोप पावत चाललेली संस्कृती आणि परंपरा जपावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी …
Read More »बेळगावातील नाईक कुटुंबियांनी साकारली कपिलेश्वर मंदिराची प्रतिकृती!
बेळगाव : बेळगावातील नाईक कुटुंबियांनी आपल्या घरातील गणपती समोर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या श्री कपिलेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. महाद्वार रोड येथील नाईक कुटुंबीय दरवर्षी आपल्या घरातील गणपती समोर वैशिष्ट्यपूर्ण देखावा सादर करतात. मागच्या वर्षी मुंबईच्या चाळीची प्रतिकृती त्यांनी सादर केली होती. यावर्षी श्री कपिलेश्वर मंदिराची प्रतिकृती सादर …
Read More »एक चांगला शिक्षक मेणबत्तीसारखा असतो तो स्वतः जळतो व विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळतो : आरती शहा
बेळगाव : दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून जायंट्स प्राईड सहेलीतर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. व्यासपीठावर प्राईड सहलीच्या अध्यक्षा आरती शहा, उपाध्यक्ष स्नेहल शहा, अॅड. अशोक पोतदार, शिवाजी हंडे, राम जोशी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून प्रार्थना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक आरती शहा यांनी …
Read More »बेळगावात अग्निवीर भरती मेळावा 19 पासून
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेंटरच्या युनिट हेडकॉर्टर कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा येत्या सोमवार दि. 19 ते सोमवार दि. 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर युनिट हेडकॉटर्स कोटा अग्निवीर भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 19 सप्टेंबर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta