Monday , April 6 2026
Breaking News

LOCAL NEWS

प्राईड सहेलीतर्फे सांबरा विमानतळावर रंगला स्वरांचा मेळावा

  बेळगाव : संगीत हा मानवाच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. जेव्हा तो खुश होतो तेव्हा एखादे गाणे गुणगुणतो दुखी झाला तर एखादे गाणे ऐकतो. संगीतामुळे मनाला शांती मिळते. म्हणून मानवाच्या जीवनात संगीताचे एक वेगळे महत्त्व आहे. असाच एक संगीताचा वेगळा सोहळा बाल दिना दिवशी संध्याकाळी प्राईड सहलीने विमानतळावर आयोजित केला …

Read More »

बेळगावात १९ डिसेंबरपासून दहा दिवस हिवाळी अधिवेशन

  मंत्रिमंडळाचा निर्णय; गोकाक येथे माता-बाल रुग्णालय, नवीन चंदन धोरणास मंजूरी बंगळूर : विधिमंडळाचे अधिवेशन येत्या १९ ते ३० डिसेंबर दरम्यान बेळगावातील सुवर्ण विधानसौधमध्ये घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. …

Read More »

बेळगाव जिल्ह्याला बोम्माई यांच्याकडून सावत्रपणाची वागणूक

  आम आदमी पक्षाचे जिल्हाधिकऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. बेळगाव : बेळगाव जिल्ह्याला नेहमीच कर्नाटक सरकारने सावत्रपणाची वागणूक दिली जाते. स्मार्टसिटी असलेल्या बेळगाव शहराला तसेच जिल्ह्याला डावलून हुबळी धारवाड, कुलबुर्गी, बंगळूरु आणि मंगळूरच्या हद्दीत हायटेक सिटी उभारण्याची घोषणा करून बेळगाव जिल्ह्याला सावत्रपणाची वागणूक दिली आहे, अशी खंत आम आदमी पक्षाचे नेते …

Read More »

दड्डी येथील बंधाऱ्याची दुरावस्था

  बेळगाव : दड्डी येथील बंधाऱ्याची दुरावस्था झाली आहे. बंधारा पूर्णपणे खचला असून प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यमकनमर्डी मतदारसंघातील दड्डी येथील नदीवर 2005 साली बंधारा बांधण्यात आला होता. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे सदर बंधारा अल्पावधीतच मोडकळीस आला आहे. या बांधऱ्यावरून हेमरस साखर कारखान्याला ऊसाची वाहतूक करणाऱ्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर …

Read More »

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बेळगावात अभिवादन

  बेळगाव : सीमाभागातील मराठी माणसाचे भक्कम आधारस्तंभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज बेळगावात विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांनी आणि शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांनी सीमावासियांना दिलेल्या भक्कम आधाराचे स्मरण करत कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 …

Read More »

बेळगावहून रत्नागिरीला जाणाऱ्या बसला अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

  कोल्हापूर : बेळगावहून रत्नागिरीला जाणाऱ्या बसला अपघात होऊन भीषण आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. केए 22 एफ 2065 क्रमांकाची बस कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यान जाधववाडी येथे खड्ड्यात पडून बसला आग लागली. बसमध्ये 13 प्रवासी प्रवास करत होते. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. पादचाऱ्याला …

Read More »

शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित आनंदमेळावा फूड फेस्टिव्हलची मुहूर्तमेढ थाटात

  बेळगाव : दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या शारदोत्सव महिला सोसायटी आयोजित आनंदमेळावा फूड फेस्टिव्हलचा मुहूर्तमेढ कार्यक्रम थाटात संपन्न झाला. यावेळी कर्नाटक राज्य भाजपा ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव, शारदोत्सव महिला सोसायटी अध्यक्षा श्रीमती अरुणा नाईक, उपाध्यक्षा डॉ. अंजली जोशी, श्रीमती शोभा डोंगरे, कार्यवाह श्रीमती सुखद देशपांडे, श्रीमती …

Read More »

स्मृतिदिनी वाहण्यात आली बाळासाहेबांना आदरांजली

  मशाल धगधगती ठेवण्याचे करण्यात आले शिवसैनिकांना आवाहन बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने शिवसेनाप्रमुख माननीय कै. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन गांभीर्याने आचरण्यात आला. शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख हणमंत मजुकर यांनी, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलित केला. महाराष्ट्र एकीकरण शहर समितीचे …

Read More »

राष्ट्रीय पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून पालिका कर्मचाऱ्यांना त्रास!

  बेळगाव : राष्ट्रीय पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक व राजकीय नेत्यांच्या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे केली आहे. महापालिकेच्या महसूल, आरोग्य, व बांधकाम विभागाचे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक स्थायी समिती सभागृहात झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. नूतन नगरसेवक व राष्ट्रीय पक्षाचे पदाधिकारी यांच्याकडून त्रास …

Read More »

तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण कसे करायचे हे भारताने दाखवून दिले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  बंगळूर टेक समिटचे उद्घाटन बंगळूर : मानवतेच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण कसे करावे हे भारताने दाखवून दिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. १६) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बंगळूर येथे कर्नाटकच्या टेक प्रदर्शन, बंगळूर टेक समिटच्या २५ व्या आवृत्तीचे उद्घाटन करताना सांगितले. बर्‍याच काळापासून, तंत्रज्ञानाला एक विशेष डोमेन म्हणून पाहिले …

Read More »