Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे देण्याची मागणी

बेळगाव : मागील दोन वर्षांपासून वसाहत योजनेच्या लाभार्थ्यांना घरी मिळालेली नाहीत. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजने मधील घरे गोरगरिबांना उपलब्ध करून द्यावीत, अशा मागणीसाठी विविध संघटनांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की अनेक वेळा स्वतःचे घरकुल मिळेल या आशेवर …

Read More »

तब्बल ७ भ्रूणांची हत्या!

मुडलगीत भयानक प्रकार उघडकीस बेळगाव : गर्भधारणा होताच आता कुठे ते अंकुर धरू लागले होते. पण खुलण्याआधीच त्या कळ्या खुडून टाकण्यात आल्या. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७ भ्रूणांची आईच्या पोटातच असताना निर्घृण हत्या करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगीत भयानक प्रकार उघडकीस आलाय. माणसाच्या क्रौर्याची परिसीमा गाठल्याचे या घटनेतून …

Read More »

करणी करणाऱ्यांना बघून घे, भक्तांचे यल्लम्मा देवीला अजब साकडे!

बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यातील लाखो भक्तांची आराध्य देवता सौंदत्ती रेणुका यल्लम्मा देवीच्या काही अजब भक्तांनी गजब पत्रे लिहून देवीला साकडे घातल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. एका भाविक महिलेने तर मराठी भाषेत चिठ्ठी लिहून मुलीला आणि जावयाला होणार त्रास दूर करण्याचे गाऱ्हाणं घातलं आहे. …

Read More »

जीएसपीएल कंपनीच्या वतीने वनमहोत्सव साजरा

बेळगाव : वाढत्या उष्णतेमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यायाने निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. निसर्गाचा समतोल अबाधित राखण्यासाठी निसर्गाची हानी न करता आपल्यपरिने प्रत्येकाने अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे विचार जीएसपीएल कंपनीचे संचालक श्री. आर. व्ही. पाठक यांनी मांडले. जीएसपीएल कंपनीच्या वतीने आयोजित केलेल्या वनमहोत्सव प्रसंगी श्री. डी. ए. …

Read More »

कुत्र्याच्या वाढदिनी घातले गाव जेवण, अन् शंभर किलोचा कापला केक

बेळगाव : ग्राम पंचायतीच्या राजकारणातून एका माजी ग्राम पंचायत सदस्याने ग्रा. पं. सदस्याला शह देण्यासाठी चक्‍क आपल्या लाडक्या कुत्र्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्यानिमित्त हजारो जणांना गाव जेवण घातले. एक क्विंटलचा केक कापला. गावकर्‍यांसाठी तीन क्विंटल चिकन, हजारो अंडी, अर्धा क्विंटल काजूकरीचा बेत करण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त तीन हजारहून अधिक …

Read More »

कावळेवाडी वाचनालयतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण

बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मौलिक विचार व्यक्त केले. ते म्हणाले, विद्यार्थी हाच देशाचा खरा शिल्पकार आहे. गाव, देश, गुरु, आईवडील यांना कधीच विसरू नका. सातत्याने अभ्यास करा. पुस्तके …

Read More »

उमेश कत्तींची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा

सिद्धरामय्या, स्वतंत्र उत्तर कर्नाटकाच्या मागणीला विरोध बंगळूर : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी गुरुवारी राज्याचे आहार व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. कत्ती यांनी राज्याचे विभाजन करण्याचे विधान जारी केले आहे, हे आक्षेपार्ह असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात त्यांनी ट्विट करून म्हटले आहे, की …

Read More »

लोकसंख्येच्या आधारे कर्नाटकात २ राज्यांचा डाव : आ. सतीश जारकीहोळी

बेळगाव : लोकसंख्येच्या आधारावर कर्नाटकचे विभाजन करून २ राज्ये निर्माण करण्याचा डाव भाजपने आखला आहे, अशी टीका केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी केली. वन मंत्री उमेश कत्ती यांनी बेळगावात बुधवारी २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात ५० नवीन राज्ये निर्माण होणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. उत्तर कर्नाटकाचेही स्वतंत्र राज्य होणार असल्याचे …

Read More »

दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंचे सुयश

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी तब्बल 7 पदके पटकावित सुयश मिळविले आहे. दिनांक 17 ते 20 जून 2022 दरम्यान रायपूर छत्तीसगढ येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील सुमारे 1900 स्केटिंग पटूंनी भाग घेतला होता. यामध्ये बेळगावच्या स्केटिंगपटूंनी …

Read More »

कुवेम्पूनगर तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष

बेळगाव : बेळगावसह संपूर्ण राज्य हादरवून सोडलेल्या कुवेम्पूनगर तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष असल्याचा निकाल धारवाड येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. बरोबर ७ वर्षांपूर्वी २०१५मध्ये बेळगावातील कुवेम्पूनगरातील एका महिलेचा आणि तिच्या २ मुलांचा अनैतिक संबंधातून खून केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणी आरोपी प्रवीण भट्ट निर्दोष असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या …

Read More »