बेळगाव : जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र स्थळाचा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केल्याच्या निषेधार्थ जैन धर्मियांनी आज सकाळी बेळगावात भव्य मोर्चा काढला. जैन धर्मियांचे अत्यंत पवित्र श्रद्धास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी परिसराला अभयारण्य म्हणून सरकारने घोषित केले आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राला जाणे-येणे कठीण होणार आहे. त्यामुळे जैन …
Read More »LOCAL NEWS
आज येळ्ळूर येथे महामेळावा जनजागृती बैठक
येळ्ळूर : कर्नाटक सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दि. 19 रोजी महामेळाव्याचे आयोजन केले आहे. सदर महामेळाव्याच्या जनजागृतीसाठी येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने शनिवार दि. 17 डिसेंबर रोजी श्री चांगळेश्वरी मंदिरात सायं. 7 वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी येळ्ळूर येथील आजी माजी जिल्हापरीषद सदस्य, …
Read More »17 कोटी 54 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द; बेळगाव जिल्हा पोलिसांची वर्षभरात मोठी कामगिरी
पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती बेळगाव : सन २०२२ मध्ये चोरी, घरफोडी तसेच फसवणूक अशा विविध गुन्ह्यांचा बेळगाव जिल्हा पोलिसांनी यशस्वी तपास करून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ३२४ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »मंगळूर स्फोट प्रकरणावरून भाजप-कॉंग्रेसमध्ये द्वंद्व; दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप
बंगळूर : कुकरचा स्फोट हा मतदार डाटा चोरीच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे. त्यांना लोक मूर्ख वाटतात. ते निवडणुकीच्या फायद्यासाठी लोकांच्या भावना भडकवत आहेत, असा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला. त्यावरून भाजप व कॉंग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले असून कॉंग्रेस-भाजपने एकमेकावर चिखलफेक केली आहे. १९ नोव्हेंबर …
Read More »ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सत्कार सोहळा लांबणीवर
बेळगाव : ऍड. नागेश सातेरी अमृतमहोत्सव सत्कार सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे. हा सत्कार सोहळा रविवार दिनांक 25 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. पण बेळगांव शहरातील सध्याची तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन सत्कार सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय सत्कार सोहळा समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्ष प्रा. आनंद मेणसे …
Read More »भाग्यनगर येथे भीषण अपघातात शाळकरी मुलाचा मृत्यू
बेळगाव : भाग्यनगर १० व्या क्रॉसनजीक मालवाहू टिप्परची धडक बसून शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. आज शुक्रवारी सायंकाळी ५ वा. सुमारास हा अपघात घडला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात असताना टिप्परने या विद्यार्थ्याला जोराची धडक दिली. या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात …
Read More »“त्या” गाडीच्या काचा अपघातात फुटल्याचे स्पष्ट
बेळगाव : बेळगाव येथील सुवर्ण विधान सौधजवळ सरकारी वाहनावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची खोटी तक्रार बेंगळुरू येथील कृषी ग्रामीण विकास बँकेच्या चालकाने दिल्याच्या घटनेचे सत्य पोलिसांनी उघड केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेतन एन. व्ही. हे कृषी ग्रामीण विकास बँकेच्या चामराजपेट, बेंगळुरूच्या चालक आहेत. हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी …
Read More »पंचायत निवडणुकीस विलंब; सरकारला पाच लाखाचा दंड : उच्च न्यायालयाचे निर्देश
बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका घेण्याच्या कथित “दिरंगाईचे डावपेच” म्हणून पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. उच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी सीमांकन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तसेच ओबीसींच्या आरक्षणाची यादी पूर्ण करण्यासाठी राज्याला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. सरन्यायाधीश प्रसन्ना बी. वराळे आणि …
Read More »महामेळाव्यासंदर्भात पोलीस अधिकारी आणि म. ए. समिती पदाधिकाऱ्यांत चर्चा
बेळगाव : दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि म. ए. समितीचे पदाधिकारी यांची बैठक आज सकाळी ठिक 10.30 वाजता असि. कमिशनर श्री. चंद्रप्पा यांच्या कार्यालयात बोलावण्यात आली होती. पोलीस उपायुक्त श्री. गडादी यांनी समिती पदाधिकारी व समितीच्या पदाधिकारी …
Read More »संत मीरा शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय मास्टर्स जलतरण खेळाडू ज्योती कोरी, संत मीरा शाळेची माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू वैष्णवी येतोजी, हनुमान स्पोर्ट्स शॉपचे संचालक आनंद सोमण्णाचे, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta