बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय मास्टर्स जलतरण खेळाडू ज्योती कोरी, संत मीरा शाळेची माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू वैष्णवी येतोजी, हनुमान स्पोर्ट्स शॉपचे संचालक आनंद सोमण्णाचे, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, माजी मुख्याध्यापिका नीलिमा गाडगीळ, शाळेच्या उप मुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, माधव पुणेकर, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पाहुण्यांनी सरस्वती, ओमकार, भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी प्रार्थना गायली. नंतर पाहुण्यांचा परिचय तांजिला बाबाखान हिने करून दिला तर पुष्पगुच्छ देऊन स्वागत विद्यार्थी पृथ्वीराज शिंदे याने केला, यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केली पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेला चालना देण्यात आली. याप्रसंगी श्रद्धा मेंडके, सविता पाटणकर, रूपाली जोशी, आशा कुलकर्णी, गीता वर्पे, धनश्री सावंत, प्रेमा मेलिंनमणी, रूपा कुमठाकर, गीता कोळेकर, सुजाता पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील ,अश्विनी लोहार, सुरेखा शहापूरकर, गौतम तेजम, मयुरी पिंगाट सिद्धार्थ हट्टी, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिका हनगंडे तर साक्षी बोरगांवकर हिने आभार मानले.