Monday , September 21 2026
Breaking News

महामेळाव्यासंदर्भात पोलीस अधिकारी आणि म. ए. समिती पदाधिकाऱ्यांत चर्चा

Spread the love

 

बेळगाव : दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी पोलीस अधिकारी
आणि म. ए. समितीचे पदाधिकारी यांची बैठक आज सकाळी ठिक 10.30 वाजता असि. कमिशनर श्री. चंद्रप्पा यांच्या कार्यालयात बोलावण्यात आली होती. पोलीस उपायुक्त श्री. गडादी यांनी समिती पदाधिकारी व समितीच्या पदाधिकारी यांच्याकडून मेळाव्याबाबत माहिती घेतली. मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या अध्यक्षांना पत्रे लिहिली असून जे नेते येतील त्यांच्याबद्दल आम्ही कळवू शिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र -कर्नाटकातून नेत्यांना अटकाव करू नये असे म्हटल्याचे सांगितले. यावर महाराष्ट्रातील नेत्यांना येऊ नका असे आवाहन करा, अशी विनंती अधिकारी यांनी केली. यावर आम्ही आमचा मेळावा शांततेत पार पाडतो आपण सर्व सहकार्य करावे अशी विनंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. बैठकीस कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजित चव्हाण-पाटील, तालुका सरचिटणीस एम. जी.
पाटील, विकास कलघटगी, असि. कमिशनर श्री. नारायण बरमणी, श्री. चंद्रप्पा खडेबाजार सी.पी. आय. श्री. निंबाळकर टिळकवाडी सी.पी.आय श्री हे उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *