Sunday , December 14 2025
Breaking News

LOCAL NEWS

प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने साने गुरुजी पुण्यतिथी साजरी

बेळगाव : महात्मा गांधींचे विचार पुढे नेणारे साने गुरुजी हे ज्येष्ठ विचारवंत आणि हाडाचे कार्यकर्ते होते. त्यांचा पिंड शिक्षकाचा असला तरी ते एक उत्तम साहित्यिक, प्रभावी वक्ता, पत्रकार आणि संपादक तसेच उत्तम भाषांतरकार अश्या अनेक भूमिकेत साने गुरुजी वावरले, असे वक्तव्य स्तंभलेखक अनिल आजगांवकर यांनी काढले. प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने …

Read More »

राज्यात सर्वत्र सतर्कतेचा इशारा

नुपूर शर्माविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सावधगिरी बंगळूर : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि त्यांचे माजी सहकारी नवीन जिंदाल यांच्या प्रेषितांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शुक्रवारी दिल्ली, झारखंडमधील रांची, सहारनपूर, मुरादाबाद आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराजसह देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्यानंतर राज्यातील पोलिस ठाण्याना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील परिस्थिती शांततापूर्ण असली तरी, …

Read More »

14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत रॉजर्स अकादमी अजिंक्य!

बेळगाव : बेळगाव ग्रामीण क्रिकेट अकादमी व एमसीसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि साई गार्डन व रेस्टॉरंट होनगा पुरस्कृत निमंत्रितांच्या 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद बेळगावच्या रोजर्स क्रिकेट अकादमी संघाने पटकाविले, तर कोल्हापूरच्या अण्णा मोगणे सहारा अकादमी संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. फिनिक्स रेसिडेंशियल पब्लिक स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या …

Read More »

एससीएम ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत मिळविले बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीने उपविजेतेपद

बेळगाव : हुबळी येथे घेण्यात आलेल्या एससीएम ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत बेळगावच्या गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीने उपविजेतेपद मिळविले. या यशाबद्दल गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीला रोख रक्कम 2000 आणि ढाल देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या बुद्धिबळपटूंनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मानांकन मिळविले. बेळगाव जिल्हा बुद्धीबळ …

Read More »

विधान परिषदच्या सर्व जागा जिंकू : मंत्री कारजोळ

बेळगाव : भाजपने काल राज्यसभेच्या तीन जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. आता 13 जून रोजी होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत भाजप सर्व चार जागा जिंकेल, असा विश्वास मंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, अत्यंत उत्साहाने पदवीधर आणि शिक्षक मतदार भाजपला पाठिंबा …

Read More »

विधान परिषद निवडणुकीनिमित्त 13 जून रोजी शाळा -कॉलेजना सुट्टी

बेळगाव : विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त कर्नाटक सरकारने येत्या 13 जून 2022 रोजी विजयापुरा, बागलकोट, म्हैसूर, बेळगाव, चामराजनगर, मंड्या, हासन, धारवाड, हावेरी, गदग आणि कारवार येथील शाळा व कॉलेजेसना सुट्टी जाहीर केली आहे. सरकारचा हा निर्णय सर्व सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा -कॉलेजेसना लागू असणार आहे. कर्नाटक वायव्य …

Read More »

बेळगावातील सगळ्या सावकारांचे सहकार्य, निरानी, शहापूर विजयी होणार : मुख्यमंत्री बोम्मई

बेळगाव : कालच्या राज्यसभा निवडणुकीत आम्ही तीन जागा जिंकल्या आहेत. आता विधान परिषदेच्या चारही जागा जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगावात व्यक्त केला. शनिवारी मुख्यमंत्री बोम्मई यांनी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने प्रथमच तीन जागा जिंकल्या आहेत. आता राज्यसभेत आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे. त्याचप्रमाणे विधानसभेच्या चार …

Read More »

आमदार बेनके यांनी घेतली पोलीस आयुक्तांची घेतली भेट

बेळगाव : हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी झालेल्या वक्तव्यावरून उठलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आमदार बेनके यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. बेळगाव शहरातील फोर्ट रोड येथे भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या प्रतिमेला फाशी देण्याचा प्रतिकात्मक प्रकार घडला होता. काही समाजकंटकांकडून हा प्रकार घडला होता, त्यामुळे शहराचे वातावरण बिघडू नये यासाठी आमदार अनिल …

Read More »

सुमन चंद्रशेखर मठद यांचे मरणोत्तर नेत्रदान

जागतिक नेत्रदानदिनादिवशीच जायंट्स आय फौंडेशनचे कार्य बेळगाव : चन्नम्मानगर येथील रहिवासी सुमन चंद्रशेखर मठद (६१) यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे निधन झाले. निधनाची बातमी समजताच त्यांचे मुलगे प्रसाद मठद यांना मदन बामणे यांनी नेत्रदानाविषयी माहिती दिली आणि आपल्या आईच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तींना ही सृष्टी पाहता येईल असे सांगितले. त्यांच्या …

Read More »

दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी प्रयत्नशील रहा : डॉ. शिवानंद बुबनाळे

जायंट्स आय फौंडेशन आयोजित ‘नेत्रदान एक सामाजिक चळवळ’ व्याख्यान संपन्न बेळगाव : दृष्टीहिन मानवाला नयनसुख मिळून जगाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी नेत्रदान करण्याचा निर्णय प्रत्येक मानवाने केल्यास त्याचा फायदा जगातील नेत्रहिन व्यक्तीना निश्चितच होवू शकेल. अर्थात एका व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान केल्यास दोन अंध व्यक्तींना त्याचा उपयोग होईल, असे केएलई …

Read More »