हुबळी : हुबळी दंगल पूर्वनियोजित कट होता. हिंदू समाजाला घाबरविण्याच्या उद्देशाने हुबळी येथील गोंधळाला दंगलीचे स्वरूप देण्यात आले. सरकारने याप्रकरणी दंगलखोरांसंदर्भात पुरुषार्थ दाखवावा, असा टोला श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी लगावला. जुन्या हुबळी येथील दंगलीतील दिड्डी हनुमंत देवस्थान आणि पोलीस स्थानकाला आज प्रमोद मुतालिक यांनी भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी …
Read More »LOCAL NEWS
राज्यात बारावीच्या परीक्षांना प्रारंभ; बेळगाव जिल्ह्यात 90 केंद्रांत परीक्षा
बेळगाव : राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. परीक्षा सुरू झाल्याबद्दल विद्यार्थीही खूप उत्सुक दिसून येत होते. बेळगाव जिल्ह्यात पीयूसी परीक्षेसाठी एकूण 51,853 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात एकूण 90 केंद्रांत परीक्षा सुरू आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 24,046, चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 27,807 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केली आहे. जिल्हा कोषागारातुन …
Read More »बेळगावात 24 एप्रिलला आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे येत्या 24 एप्रिल रोजी भारत, इराण आणि जॉर्जिया या आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हे मैदान यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. कोल्हापूरच्या खासबाग मैदान आखाड्यानंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नामवंत आखाडा म्हणजे बेळगावचा आनंदवाडी आखाडा होय. या आखाड्याची आसन …
Read More »वायव्य शिक्षक निवडणूकीसाठी प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी
बेळगाव : कर्नाटकातील वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश हुक्केरी यांच्या नांवाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी नवी दिल्ली येथे ही घोषणा केली. प्रकाश हुक्केरी हे ज्येष्ठ राजकीय …
Read More »भाजपला 10 गुंठे जागा महापालिकेकडून मंजूर
बेळगाव : बेळगाव शहरातील धर्मनाथ सर्कल जवळील तब्बल 10 गुंठे जागा 77,62,500 रुपये किंमतीमध्ये भारतीय जनता पक्षाला देण्यात आली आहे. महानगरपालिकेने आपल्या मालकीची ही जागा भाजपचे कार्यालय बांधण्यासाठी दिली असून गेल्या 3 मार्च 2022 रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावे याबाबतचा दस्त झाला आहे. बेळगाव महापालिकेची धर्मनाथ सर्कल जवळील सीटीएस क्र. …
Read More »मंगळुरू येथे मशिदीच्या डागडुजीदरम्यान सापडले मंदिराचे अवशेष!
प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन मंगळुरू : कर्नाटकमधील मंगळुरु येथील एका मशिदीच्या डागडुजीच्या कामाकाजाच्या वेळी मशिदीखाली हिंदू मंदिर सदृश्य असे काही अवशेष सापडले आहेत. मंगळुरुपासून काही अंतरावर असणार्या या मशिदीखाली मंदिराचे अवशेष सापडल्याची बातमी वार्यासारखी परसरली असून हा सारा प्रकार गुरुवारी समोर आल्याची माहिती एनआय या वृत्तसंस्थेने दिली. मिलाली येथील जुमा …
Read More »कारागृहांना डिजिटल सुरक्षा व्यवस्था; आता कारागृह कर्मचार्यांच्या गणवेशावर कॅमेरा
बेंगळुर : राज्यातील 104 कारागृहांसह देशभरातील 1350 कारागृहांमधील गैरप्रकार टाळण्यासाठी डिजिटल सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. तसेच कैद्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. गंभीर आरोपाखाली शिक्षा भोगणार्या कैद्यांना कारागृहामध्ये चोरट्या मार्गाने अनेक सुविधा दिल्या जात आहेत. तसेच अधिकार्यांच्या भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे. कारागृहातील …
Read More »अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघ शेट्टी स्मृती चषक टी-20 चा मानकरी
बेळगाव : के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित दुसऱ्या शेट्टी स्मृती चषक टी -20 क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद आज अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने पटकाविले. अंतिम सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स हुबळी संघाने प्रतिस्पर्धी साईराज वॉरियर्स संघावर 5 धावांनी शानदार विजय मिळवला. कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर आज गुरुवारी साईराज वॉरियर्स आणि अर्जुन …
Read More »कर्नाटकात ‘आप’ तिसरे सरकार स्थापन करेल : अरविंद केजरीवाल
बेंगळूर : दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत आल्यानंतर आम आदमी पक्ष दक्षिणेकडील राज्य कर्नाटकात तिसरे सरकार स्थापन करेल, असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. ते गुरुवारी कर्नाटकात आम आदमी पक्षाच्या (आप) निवडणूक मोहिमेला सुरुवात करताना बोलत होते. नॅशनल कॉलेजच्या मैदानावर झालेल्या रॅलीत बोलताना केजरीवाल यांनी कर्नाटक राज्य कंत्राटदार संघटनेने …
Read More »हुतात्म्यांच्या वारसांना श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून मदत
बेळगाव : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या आजारी पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुंबईच्या श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून उपचारासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मीताई बेन्नाळकर यांना प्रकृती खालावल्यामुळे केएलई हॉस्पिटलमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta