Thursday , June 4 2026
Breaking News

राज्यात बारावीच्या परीक्षांना प्रारंभ; बेळगाव जिल्ह्यात 90 केंद्रांत परीक्षा

Spread the love


बेळगाव : राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. परीक्षा सुरू झाल्याबद्दल विद्यार्थीही खूप उत्सुक दिसून येत होते.
बेळगाव जिल्ह्यात पीयूसी परीक्षेसाठी एकूण 51,853 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात एकूण 90 केंद्रांत परीक्षा सुरू आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 24,046, चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात 27,807 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदणी केली आहे.
जिल्हा कोषागारातुन प्रश्नपत्रिका पुरवण्यासाठी 26 वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. आता परीक्षा केंद्रांच्या 200 मीटरच्या परिसरात जमावबंदी आदेश स्थगिती जारी करण्यात आला आहे. सर्व परीक्षा केंद्रांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. बेळगावातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. हिजाब काढून ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करण्यात आली होती. हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थीनींनी हिजाब काढून परीक्षा दिली.

About Belgaum Varta

Check Also

कोर्ट परिसर आहे की दारूचा अड्डा; जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

Spread the love  बेळगाव : न्यायदानाचे पवित्र केंद्र मानल्या जाणाऱ्या कोर्ट परिसरातच मद्यपान करून बाटल्या इतरत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *