Sunday , July 26 2026
Breaking News

वायव्य शिक्षक निवडणूकीसाठी प्रकाश हुक्केरी यांना उमेदवारी

Spread the love

 

 

 

 

 

 

 

 

बेळगाव : कर्नाटकातील वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश हुक्केरी यांच्या नांवाची घोषणा करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी नवी दिल्ली येथे ही घोषणा केली.
प्रकाश हुक्केरी हे ज्येष्ठ राजकीय नेते असून त्यांनी सहा वेळा आमदार आणि एकदा खासदार पद भूषविले आहे. वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यांना भाजपचे विद्यमान आमदार अरुण शहापूर यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
प्रकाश हुक्केरी यांनी 2013 ते 18 या कालावधीत सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद देखील भूषविले आहे. त्यांनी 2014 मध्ये चिकोडी लोकसभा निवडणूक जिंकली, मात्र त्यानंतर 2019 मध्ये त्यांना भाजपचे अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
या अगोदर प्रकाश हुक्केरी यांनी विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही प्रकारच्या निवडणुका लढवल्या होत्या आता विधानपरिषदेच्या रूपाने ते शिक्षक मतदारसंघात आपली ताकत आजमावणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *