Monday , December 15 2025
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव विमानतळावर राज्यातील पहिली ॲम्बुलिफ्ट सुविधा

बेळगाव : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) बेळगाव विमानतळावर पॅसेंजर बोर्डिंग लिफ्ट (पीबीएल) अर्थात ॲम्बुलिफ्टची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्नाटकात अशाप्रकारे पहिल्यांदाच ही सुविधा उपलब्ध झाली आहे. विमानाने प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांसाठी बोर्डिंग वाहन म्हणून ॲम्बुलिफ्टचा वापर केला जातो. कमी गतिशील (पीआरएम) किंवा अपंग विमान प्रवासी, प्रामुख्याने व्हीलचेअर वापरणाऱ्या व्यक्तींना …

Read More »

रेल्वे स्थानकावर शिवरायांची प्रतिमा बसवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांकडे आम. बेनके यांची मागणी

बेळगाव : पुनर्निर्मित बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा नसल्याने व्यक्त होणाऱ्या तीव्र संतापाची दखल घेत उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव रेल्वे स्थानकावर श्री छ. शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा उभाराव्यात, अशी मागणी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दादाराव दानवे यांच्याकडे केली आहे. बेळगावचे …

Read More »

सामुदायिक उपनयन समारंभ 11 मे रोजी

बेळगाव : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ आणि समर्थ सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामुदायिक उपनयन समारंभ बुधवार दि. 11 मे 2022 रोजी होणार आहे. चिदंबर नगर येथील चिदंबरेश्वर देवस्थानात होणाऱ्या या समारंभात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अरविंद कुलकर्णी 9341111357, सुहास कुलकर्णी 9448036915 किंवा अभय जोशी 9845517766 यांना संपर्क साधावा असे आवाहन …

Read More »

केंद्रीय तपास यंत्रणांचा सूडबुद्धीने होत असलेला वापर थांबवा

मा.राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्री यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन बेळगाव : देशभरात चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत जी कारवाई होत आहे ती कुठे तरी थांबावी आणि देशाची लोकशाही अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देशाचे महामहिम राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्रीना निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत …

Read More »

शिवजयंती उत्सव दणक्यात होऊ द्या

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 4 मे रोजी शिवजयंती उत्सव साजरा करायचा असून त्यासंदर्भात नियोजनासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाने मंगळवारी सायंकाळी धर्मवीर संभाजीराजे चौकातील जत्तीमठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव होते. सुनील जाधव म्हणाले की, बेळगाव शहर परिसरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाला आदर्श …

Read More »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात २.७५ टक्के वाढ

बंगळूर : बसवराज बोम्मई प्रशासनाने मंगळवारी (ता.५) सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) त्यांच्या मूळ वेतनाच्या २४.५० टक्क्यावरून २७.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २.७५ टक्के वाढीव डीए मिळणार आहे. हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल, असे वित्त विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे. …

Read More »

माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडे

वेदांत सखी ग्रुपच्या महिला दिन कार्यक्रमात अनुजा रजपुत यांचे प्रतिपादन बेळगाव : आपल्या कुटुंबासाठी सर्व स्त्रिया कष्ट घेत असतात. कौटुंबिक कामाबरोबरच छंदही जोपासतात. इतरांपेक्षा काही वेगळे करण्याची भावना बरेच काही चांगले कार्य करून जात असते. अशाच इच्छेतून मी समुद्रसपाटीपासून 5864 मीटर उंचीच्या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. शिखरावर पोहोचल्यानंतर झालेला आनंद …

Read More »

ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शकता हेच तनिष्कचे यश : संदीप कुलहळी यांची माहिती

बेळगाव : गेल्या सहा वर्ष बेळगावच्या चोखंदळ ग्राहकांनी तनिष्कच्या दागिन्यांना भरघोस प्रतिसाद दिला. ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार हेच तनिष्कच्या यशाचे गमक असल्याची माहिती टाटा समूहाच्या कॅरेटलेन बोर्डाचे सदस्य संदीप कुलहळी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संतोष चांडक संचालित टाटा सुमुहातील तनिष्कच्या बेळगाव खानापूर रोड टिळकवाडी कृष्णाई आर्केड येथील नव्या भव्य …

Read More »

बेळगावसह 3 ठिकाणी खत प्रकल्प : मंत्री मुरुगेश निराणी

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारने अंदाजे 7,000 कोटी रुपये खर्चून खत उद्योग सुरू करण्याची योजना आखली असून या प्रकल्पासाठी दावणगिरी, बेळगाव आणि मंगळूर या तीन शहरांची निवड करण्यात आली आहे, अवजड आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्री मुरुगेश निराणी यांनी ही माहिती दिली. मंगळूर येथे काल सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मंत्री …

Read More »

रणकुंडये खून प्रकरणी चार जणांना अटक

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील रणकुंडये खून प्रकरणाचा तिढा सोडवण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. शनिवारी मध्यरात्री रणकुंडये येथील नागेश पाटील (वय 31) या युवकाचे घरातून अपहरण करून धारधार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करत निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी आरोपी असलेला …

Read More »