Monday , April 20 2026
Breaking News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात २.७५ टक्के वाढ

Spread the love

बंगळूर : बसवराज बोम्मई प्रशासनाने मंगळवारी (ता.५) सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) त्यांच्या मूळ वेतनाच्या २४.५० टक्क्यावरून २७.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २.७५ टक्के वाढीव डीए मिळणार आहे.
हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२२ पासून लागू होईल, असे वित्त विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
केंद्राने आपल्या कर्मचार्‍यांचा डीए तीन टक्क्यांनी वाढवून ३१ टक्के केल्याच्या काही दिवसांनंतर हे घडले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, २.७५ टक्के वाढीमुळे सरकारच्या तिजोरीवर वार्षिक १,४४७ कोटी रुपयांचा भार पडणार आहे.
नवीन वेतनवाढ पूर्णवेळ सरकारी कर्मचारी, जिल्हा पंचायतींचे कर्मचारी, नियमित वेतनश्रेणीवर काम करणार्‍या कर्मचारी, अनुदानित शैक्षणिक संस्थांचे पूर्णवेळ कर्मचारी आणि नियमित वेतनश्रेणीवर असणार्‍या विद्यापीठांना लागू होईल.
डीए वाढीमुळे पेन्शनधारक, युजीसी/एआयसीटीई/आयसीएआर वेतनमानावरील वर्तमान आणि माजी कर्मचाऱ्यांनाही फायदा होईल, असे वित्त विभागाने म्हटले आहे.
या वेतनवाढीचा फायदा तब्बल सहा लाख कर्मचारी आणि साडेचार लाख पेन्शनधारकांना होणार आहे. याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये, सरकारने मूळ वेतनाच्या २१.५ टक्यावरून २४.५ टक्के डीए वाढवला होता.

About Belgaum Varta

Check Also

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

Spread the love  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *