Sunday , July 26 2026
Breaking News

केंद्रीय तपास यंत्रणांचा सूडबुद्धीने होत असलेला वापर थांबवा

Spread the love

मा.राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्री यांना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन

बेळगाव : देशभरात चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत जी कारवाई होत आहे ती कुठे तरी थांबावी आणि देशाची लोकशाही अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देशाचे महामहिम राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्रीना निवेदन बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत सादर करण्यात आले.
दिनांक ५ एप्रिल २०२२ रोजी प्रसार माध्यमातून शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे राहते घर आणि इतर मालमत्ता प्रवर्तन निर्देशालायने जप्त केली अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यानंतर त्याला संजय राऊत यांनी सुद्धा दुजोरा देताना म्हणाले की, एक रुपया जरी भ्रष्टाचार किंवा चुकीच्या मार्गाने कमविला असेल तर माझी संपत्ती भाजपाला दान करेन असे सांगितले.
केंद्र सरकार आपल्या सत्तेचा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबण्याच्या हेतूने आणि सूडाच्या भावनेनं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत असल्याचे दिसून येते जे सदृढ लोकशाहीचे लक्षण नाही.
केंद्रीय तपास यंत्रणांचा सूडबुद्धीने वापर होत असलेल्या प्रकरणात लक्ष घालून सदर प्रकार थांबविले जावेत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने महामहिम राष्ट्रपती यांना मा. जिल्हाधिकारी बेळगाव यांच्यामार्फत निवेदन देऊन केली आहे.
यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा समिती कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, खजिनदार मनोहर हुंदरे, दक्षिण प्रमुख प्रवीण रेडेकर, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेविका वर्षा आजरेकर, सुधा भातकांडे, भागोजीराव पाटील, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, गीता हलगेकर, शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले, शिवसेनेचे महेश टंकसाळी, राजकुमार बोकडे, दिलीप बैलूरकर, राजू पावले, शांताराम होसुरकर, सुनील बोकडे, किरण मोदगेकर, राजू कणेरी, राजू शहापुरकर, नितीन खंनुकर, अरुण पोटे, वासू सामजी, विनायक कावळे, सुधीर शिरोळे, प्रशांत भातकांडे, नारायण मुचंडीकर, सिद्धार्थ चौगुले, आकाश भेकणे, ओमकार आपटेकर, अभि जाधव, महेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *