बेळगाव : खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केला असेल तरच त्यांना जून महिन्याचा पगार मिळणार आहे. प्राप्तिकर खात्याच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केला नसेल तर त्यांचा जून महिन्याचा पगार खात्यावर जमा करू नये अशी सूचना प्राप्तिकर खात्याने खासगी कंपन्यांना केली आहे. त्यामुळे ३० जूनच्या आत आपल्या बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक करणे खासगी कर्मचाऱ्यांना क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे बँक खात्याशी आधार आणि पॅनकार्ड लिंक केले नाही तर अशी पॅनकार्डे निरुपयोगी ठरणार आहेत. अशा पॅनकार्डच्या सेवा स्थगित ठेवण्यात येणार आहेत असे प्राप्तिकर खात्याने कळविले आहे.