खानापूर (प्रतिनिधी) : पीकेपीएस सोसायटीची मागणी खानापूर तालुक्याच्या जांबोटी भागातील कुसमळी, देवाचीहट्टी, उचवडे या तीन गावासाठी करण्यात आली. अशा मागणीचे निवेदन बेळगाव जिल्हा डीसीसी बँकेचे चेअरमन व माजी खासदार रमेश कत्ती यांना भाजपा युवा नेता पंडित ओगले यांच्या पुढाकाराने गेलेल्या एका शिष्टमंडळाने आज बेळगाव येथे त्यांची भेट घेऊन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याच्या जंगलभागात येणाऱ्या उचवडे, कुसमळी, देवाचीहट्टी या गावाना अडचण भासत आहे. तेव्हा तिन्ही गावची मिळून नविन पीकेपीएस सोसायटी झाल्यास शेतकरी वर्गाची सोय होणार आहे.
चेअरमन रमेश कत्ती यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पंडित ओगले, जांबोटी भागाचे माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मणराव बामणे, अनंत सावंत, पवण गायकवाड, प्रदीप कवठणकर, परशराम नाईक, चंद्रकांत पाटील, किरण तुडयेकर आदी उपस्थित होते.