निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा : देशभरातून एकमेव निवड
निपाणी : सँबो युनियन ऑफ एशियाची बैठक ताश्कंद येथे पार पडली. त्यामध्ये युनियनच्या जनरल सेक्रेटरीपदी निपाणी येथील मेस्त्री गल्लीतील रहिवासी रघुनाथ शिंत्रे यांची संपूर्ण भारतातून एकमेव निवड झाली आहे. त्यामुळे निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रे हे सध्या गोवा येथे राज्य पातळीवरील वरिष्ठ ज्युडो प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीमुळे निपाणी परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
रघुनाथ शिंत्रे यांचे निपाणी येथील विद्या मंदिर शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर (अर्जुननगर, ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात वाणिज्य विभागातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. येथे कार्यरत असताना त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील ज्युडो स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्यानंतर मिरज येथे बीपीएड प्रशिक्षण घेऊन पंजाबमधील पटियाला येथे ज्युडो प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेतले. तेंव्हापासून रघुनाथ शिंत्रे हे गोवा येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सॅबो युनियन ऑफ एशिया या संस्थेतर्फे समाजातील अपंग, मतिमंद, मुके-बहिरे युवकांना ज्युडो व धावण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेमध्ये शिंत्रे यांनी बरेच वर्षे कार्य केले आहे. त्यांनी प्रशिक्षण दिलेले अनेक अपंग मतिमंद युवक-युवती राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पदके पटकाविली आहेत.
भारतीय प्रशिक्षक म्हणून त्यांनी कोरिया, इंग्लंड, जपान, साऊथ कोरिया अशा विविध देशांमध्ये काम केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत देशभरातून संस्थेच्या जनरल सेक्रेटरी पदी शिंत्रे यांची एकमेव निवड करण्यात आली आहे.
—-
’सर्वत्र अपंग, मतिमंद, गतिमंद, मुके-बहिरे अशा मुलांच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. त्यांच्याकडेही अनेक कलागुण असतात. ते हेरून त्यांना ज्युडो धावणेसह इतर खेळांचे प्रशिक्षण संस्थेतर्फे दिले जाते. या पुढील काळातही अशा विद्यार्थ्यांमध्ये आत्मनिर्भरता आणून त्यांच्या जीवनात नवीन आशेचा किरण देण्याचा प्रयत्न करणार आहे.’
– रघुनाथ शिंत्रे, सँबो युनियन ऑफ एशिया, जनरल सेक्रेटरी.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …