Sunday , December 14 2025
Breaking News

संकेश्वरात ‘स्वयंसिद्धा’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन : अरुणा कुलकर्णी

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येत्या ६ मार्च २०२२ रोजी श्री शंकरलिंग समुदाय भवन येथे स्वयंसिद्धा कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती अरुणा कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी स्वयंसिद्धा कार्यक्रमाच्या संयोजिका नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, डॉ. श्वेता मुरगुडे, मंजुळा हतनुरी, शिल्पा कुरणकर, डॉ. विजयालक्ष्मी मिर्जी उपस्थित होत्या.

अरुणा कुलकर्णी पुढे म्हणाल्या, गेल्या वर्षी स्वयंसिद्धा कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या वर्षी देखील आंम्ही महिलांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये केक तयार करणे, मेहंदी आणि केशरचना स्पर्धा घेतली जाणार आहे. महिलांना अर्थाजन करण्यासाठी या स्पर्धा निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. त्याचप्रमाणे यावेळी महिलांना प्रत्यक्ष सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिलांना आपण तयार केलेले विविध खाद्यपदार्थ, कपडे, ज्वेलरी अशा विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी आकर्षक पन्नास स्टाॅलची रचना करण्यात आली आहे. यामध्ये संकेश्वर परिसरातील महिलांबरोबर गडहिंग्लज निपाणी, बेळगांव येथील महिला देखील सहभागी होणार आहेत. स्टाॅलचा उदघाटन सोहळा दुपारी १ वाजता संपन्न होणार आहे. दुपारी ३ वाजता होणाऱ्या मुख्य समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती शीला उमेश कत्ती, श्रीमती जयश्री रमेश कत्ती, उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्त्या म्हणून बेळगांवच्या प्रख्यात लेखिका माधुरी शानभाग उपस्थित राहणार आहेत. मुख्य समारंभात विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले जाणार आहे. सायंकाळी संगीत नृत्य व इतर कलाविष्कार कार्यक्रम सादर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. श्वेता मुरगुडे, डॉ. विजयालक्ष्मी मिर्जी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित स्वयंसिद्धा कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा असे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

कुर्लीत रविवारी १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन

Spread the love  अध्यक्षपदी अभियंते प्रसाद कुलकर्णी; दिवसभर पाच सत्रांचे आयोजन निपाणी (वार्ता) : कुर्ली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *