Tuesday , March 3 2026
Breaking News

हौसिंग काॅलनी अंगणवाडीत महिला दिन साजरा

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हौसिंग काॅलनीतील अंगणवाडीत जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यग्रमात अक्कन बळगच्या संस्थापिका श्रीमती शारदा दुधीहाळमठ यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. उपस्थितांचे स्वागत अंगणवाडी सेविका श्रीमती सी. ए. कर्निंग यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त हौसिंग काॅलनीतील शतायुषी महिला श्रीमती सत्यव्वा भरमा नाईक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित महिलांची श्रीमती शशीकला नाईक यांनी ओटी भरुन महिला दिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. मनोरंजन कार्यक्रमात काॅलनीतील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन भावगीत, सिनेगीत नाटक सादर केले. कार्यक्रमाला माजी नगरसेविका शांता तंबद, आशा संसुध्दी, अक्काताई संसुध्दी, विजया निंगनुरे, शशीकांत नाईक, पुटक्का पाटील, रुपा गडकरी, विद्या चौगुला, गीता बिद्रोळी, अन्नपूर्णा संसुध्दी, सुनंदा घोडगेरी, मुली-महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आभार श्रीमती सी. ए. कर्निंग यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे

Spread the love  गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *