Tuesday , March 3 2026
Breaking News

बाड गावची आमंत्रण पत्रिका चक्क पुनित राजकुमार समाधीस्थळी….

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : कन्नड चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार पुनित राजकुमार काळाच्या पडद्याआड जाऊन महिनाभराचा कालावधीत लोटला तरी त्यांचे असंख्य चाहते, अभिमानींना पुनित यांचे जाणे मनाला पटेणासे झाले आहे. अभिनेते पुनित राजकुमार यांचा बाड तालुका हुक्केरी येथील फॅन (अभिमानी) मंजुनाथ खोत यांनी आपल्या मेडिकल स्टोअर्सचे पुनित राजकुमार मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स असे नामकरण केले आहे. त्याचा उदघाटन सोहळा नुकताच संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी यांचे हस्ते पार पडला. दरम्यान बाड तालुका हुक्केरी येथील पुनित राजकुमार मेडिकल स्टोअर्सचे मालक मंजुनाथ यांनी आमंत्रण पत्रिका घेऊन बेंगळूर गाठले. पुनित राजकुमार यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी समाधीस्थळवर आमंत्रण पत्रिका ठेवून आदरांजली वाहिली.

पत्रकारांशी बोलताना मंजुनाथ म्हणाले, मी पुनित राजकुमार यांचा मोठा चाहता आणि अभिमानी आहे. पुनित अण्णांचे जाणे मनाला न पटणारे ठरले आहे. पुनित यांच्या निधनानंतर त्यांच्या सामाजिक कार्याने सर्वांना अचंबित केले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा चालविण्याचे कार्य त्यांचे कुटुंबीय निश्चितच करतील.आपण त्यांचे चाहते आहोत या गोष्टीचा कदापी विसर होता कामा नये यासाठी आपण बाड येथे पुनित राजकुमार नावाने मेडिकल स्टोअर्स प्रारंभ केले आहे.उदघाटन सोहळ्याला संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, डॉ. शशीकांत कोरे, डॉ. दिपक अंबली, डॉ. रमेश दोडभंगी, डॉ. मास्तीहोळीमठ, बाड ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी आपण पुनित राजकुमार नावाने मेडिकल स्टोअर्स प्रारंभ केलेबदल कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *