

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हरीश मेडिकल स्टोअर्सचे मालक दिवंगत राजू भोई यांचा जन्मदिन भोई परिवाराने एकस्तासीस चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांसंगे आचरणेत आणला. श्रीमती ज्योती भोई यांनी चिल्ड्रन्स होममधील अनाथ मुलांना केक स्वीट वाटप करुन एकस्तासीस होमला आहरकिटचे वाटप केले. त्याचबरोबर संसुध्दी गल्लीतील निराधार महिलेला तांदुळ गोडेतेल साखर अशा जीवनावश्यक वस्तूंचे आहार किट वाटप केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संकेश्वरातील बऱ्याच लोकांना प्राण गमवावे लागले. यामध्ये हरीश मेडिकल स्टोअर्सचे मालक राजू भोई यांचा समावेश होतो. दिवंगत राजू भोई यांचा जन्मदिन भोई परिवाराने सामाजिक कार्याने आचरणेत आणून समाजापुढे आदर्श ठेवला आहे. यावेळी एकस्तासीस चिल्ड्रन्स होमच्या प्रमुख जेसी सॅम्युएल मंडाडी, चंदकांत भोई, दयानंद आलुरी, पुष्पा डी. आलुरी, हरीश भोई, विशाल मन्नीकेरी, अनाथ मुले-मुली उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta