Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे महिला दिन साजरा

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. येथील श्री महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सौ. शैलजा जेरे, सौ. शिवलीला कुंभार, सौ. रूपा चौगुला, श्रीमती विजयालक्ष्मी भागवत यांनी महिलांना योग- प्राणायामाचे महत्व समजावून सांगितले. यावेळी बोलताना सुरेखा शेंडगे म्हणाल्या, आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना महिलांच्या आरोग्याचा विषय प्रामुख्याने विचाराधीन असायला हवा आहे. कुटुंबाचे आरोग्य सांभाळणेचे कार्य करताना महिलांनी प्रथम स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवण्याचे कार्य देखील करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. योग शिक्षक पुष्पराज माने, परशुराम कुरबेटी, रावसाहेब पाटील, मल्लाप्पा कुरबेटी, नागराज नाईक यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.

यावेळी प्रमिला देसाई, मंगल निडसोसी, विद्या नाईक, योग साधक उपस्थित होते. यावेळी पतंजली योग समितीच्या वतीने महिलां योग साधकांना भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने

Spread the love  आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *