संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात दुकानदारांनी, नागरिकांनी विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलेला दिसला. गावात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व व्यवहार बंद दिसले.
गेल्या दोन वर्षांत संकेश्वरकरांना कोरोना महामारीने विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यूचा चांगला-वाईट अनुभव मिळाल्याने आज वाईन्स शॉप, हॉटेल, कापड दुकाने, स्टेशनरी, मोबाईल शॉप, सराफी दुकाने, शू-मार्ट, दुचाकी-चारचाकी वाहन गॅरेज, असे सर्वच व्यवहार ठप्प दिसले. गावात किराणा दुकान, भाजीपाला, फळे, मांस हॉटेल खानावळ बस, टो टॅक्सी शासकीय-खासगी रुग्णालय, औषध दुकाने, शेतकरी पशुखाद्य, खत अशी सर्वच जीवनावश्यक वस्तू आणि सेवा सुरु राहिल्याने लोकांची सोय झालेली दिसली. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला लोकांनी विशेष करुन दुकानदारांनी आपला पाठिंबा दर्शविलेला दिसला. बसस्टँडमध्ये बससेवा सुरु असली तरी विकेंड कर्फ्यूमुळे प्रवाशांची रेलचेल कमी स्वरुपात पहावयास मिळाली. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी विकेंड कर्फ्यूची सक्तीने नव्हे तर प्रेमाने अंमलबजावणी केल्यामुळे लोक कामानिमित्त बिनधास्त घराबाहेर पडताना दिसले. विकेंड कर्फ्यूमुळे जुना पुणे-बेंगळूर महामार्ग तसेच गावातील सर्वच रस्ते निर्मनुष्य दिसले. गावातील प्रमुख बाजारपेठ ओस पडलेली दिसली.
Check Also
वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप
Spread the love दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …