Saturday , December 7 2024
Breaking News

संकेश्वर चिफ ऑफिसर मिनिस्टरचे ऐकेना…

Spread the love

संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी हे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सांगितलेली कामे करावयास तयार नसल्याचे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले.
पालिका सभेत त्यांनी संकेश्वर कोर्टाला जाणारा रस्ता अरुंद असल्याने तो ताबडतोब रुंद डांबरीकरण करण्याचा आदेश मंत्रीमहोदयांनी मुख्याधिकारींना देऊन सहा महिने लोटले तरी अद्याप सदर रस्त्याचे काम हाती घेतले गेलेले नसल्याचे सांगितले. त्यावर ईटी-गडाद यांनी उडवाउडवीचे उत्तर देवून वेळमारुन नेण्याचे काम केले. यापूर्वी नगरसेवक-नगरसेविकांनी मंत्री महोदयांनी नारळ फोडलेल्या विकास कामे केंव्हा करणार? प्रश्न ईटी यांना विचारला आहे. त्यावर त्यांनी चुप्पी साधली आहे.
संकेश्वरची पाणीपट्टी वर्षाला दोन हजार
नगरसेवक संजय शिरकोळी, अमर नलवडे तसेच सर्वच सदस्यांनी अन्यायकारक पाणीपट्टीचा विषय उचलून धरल्याने मुख्याधिकारींची गोची झाली आहे. संकेश्वरकरांची 24 x7 पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली लुबाडणूक केली जात आहे. संकेश्वरकरांना 24 तास पाणीपुरवठा योजनेचे पाणी दिवसभरात ठराविक दीड-दोन तास मात्र पुरवठा केला जात आहे. पाणीपट्टी मात्र मिटर रेडिंगनुसार केली जात आहे. त्यामुळे पालिका सदस्यांनी मुख्याधिकारींना 24 तास पाणीपुरवठा करीत नसाल तर मिटर रेडिंगनुसार पाणीपट्टी आकारणी बंद करा असे बजावले आहे.
संकेश्वरातील नळधारकांना पूर्वी दररोज दीड-दोन तास पाणीपुरवठा व्हायचा तसाच सध्या देखील होतो आहे. पूर्वी वर्षाकाठी 1560 रुपये पाणीपट्टी आकारली जायची. सध्या मिटर रेडिंगनुसार अव्वाची-सव्वा पाणीपट्टी आकारली जात आहे. त्यामुळे पालिका सभेत सर्व 28 सदस्यांनी एकमताने अन्यायकारक पाणीपट्टी आकारणी थांबवून वर्षाकाठी 2 हजार रुपये मात्र आकारले जावेत असा ठराव मांडला आहे. नगरसेवक अमर नलवडे यांनी मुख्याधिकारींना बेळगांव महानगरपालिका, गोकाक, अथणी, निपाणी सिटी म्युनिसिपलपेक्षा संकेश्वर पालिकेची पाणीपट्टी जादा असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. जानेवारी 2022 पासून पाणीपट्टी वर्षाकाठी 2 हजार रुपये मात्र आकारले जावेत असा ठराव संमत केला आहे. त्यामुळे संकेश्वर नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी होते.
सभेला सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अ‍ॅड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, रोहन नेसरी, सचिन भोपळे, चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, जितेंद्र मरडी, डॉ. मंदार हावळ, हारुण मुल्ला, विवेक क्वळी, नगरसेविका श्रीविद्या बांबरे, सुचिता परीट, मनोरमा सुगते, रिजवाना रामपूरे, संगिता कोळी, पार्वती नाईक, महादेवी संसुध्दी, शेवंता कब्बूरी उपस्थित होते.

संकेश्वर 24 तास पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार : संजय नष्टी


संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात 24 x7 पाणीपुरवठा योजना फारशी यशस्वी झाली नसून योजनेतील रस्ता पॅचवर्क पैशाचा हिशोब अद्याप दिला गेलेला नसल्याचे नगरसेवक संजय नष्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, संकेश्वरात 24 तास पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी घालण्यासाठी गावभर रस्ते खाणण्यात आले. रस्ता पॅचवर्क कामासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रस्ता पॅचवर्कचे काम नाही आणि पैशाचा हिशोब देखील अद्याप दिला गेलेला नाही. मुख्याधिकारी जगदीश ईटी अभियंता आर. बी. गडाद गावातील रस्ता पॅचवर्क कामाबाबत चुप्पी साधून आहेत. संकेश्वरकरांना 24 x7 योजनेचे पाणी दररोज कांहीं तास मात्र पुरवठा केले जात आहे. पालिकेकडून पाणीपट्टी मात्र 24 तास योजनेनुसार अन्यायकारक आकारली जात आहे.ती ताबडतोब बंद करावी. संकेश्वरातील नळधारकांकडून पालिकेने पूर्वीप्रमाणेच वर्षाकाठी 1560 रुपये आकारावेत. योजनेतील त्रुटी विषयी यापूर्वी संतोष मुडशी, जितेंद्र मरडी, संजय नष्टी, राहुल हंजी, दिलीप होसमनी शिष्टमंडळाने योजनाधिकारी करीबसप्पा यांना निवेदन सादर केले आहे.
संकेश्वर पालिका सभेत सर्व सदस्यांनी एकमताने मांडलेला पाणीपट्टी वर्षाकाठी 2 हजार रुपये आकारणीचा ठराव संकेश्वरकरांना न्याय मिळवून देणारा, दिलासा देणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले.

 

About Belgaum Varta

Check Also

घटप्रभा नदीत बुडून दोन मुलासह वडिलांचा मृत्यू

Spread the love  हुक्केरी : मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडीलासह दोन मुलांचा नदीत बुडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *