Saturday , June 15 2024
Breaking News

कन्नड भाषा शिकायला हवी : अमर नलवडे

Spread the love

संकेश्वर (वार्ता) : आपण कर्नाटक राज्यात राहत असल्याने येथील कन्नड भाषा लिहायला, वाचायला शिकायला हवी असल्याचे संकेश्वर मराठा समाज सोसायटीचे अध्यक्ष अमर नलवडे यांनी सांगितले.
ते सोसायटीच्या 14 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आयोजित मराठा समाजाती दहावी-बारावी परिक्षेची व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्काराने सन्मान करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत जयप्रकाश सावंत यांनी केले. छत्रपती शिवरारायांच्या प्रतिमेला वंदन करुन सभेची सुरुवात करण्यात आली.
अमर नलवडे पुढे म्हणाले, आज मुला-मुलीनी केवळ मातृ भाषा मराठी शिकून चालणार नाही. त्याबरोबर कन्नड हिन्दी आणि इंग्रजी भाषा शिकायला हवी आहे. त्याचबरोबर आजकाल संगणकाचे ज्ञान देखील गरजेचे आहे तेही शिकून घेतले पाहिजे. गेल्या चौदा वर्षांत मराठा समाजाची म्हणावी तेवढी प्रगती झालेली नाही. या गोष्टीची खंत वाटते. आता नव्या दमाने हुक्केरी तालुक्यात मराठा समाज संघटना करण्याचे काम समस्त मराठा समाज बांधवांना बरोबरीने घेऊन केले जाईल. लवकरच मराठा समाज बांधवांना विद्यार्थ्यांना शासकीय सवलतींचा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पालिकेजवळ माहिती केंद्र सुरू करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठा वधुवर मेळावा आयोजित करण्याचे कार्य केले जाणार आहे. समाज बांधवांना ओळखपत्र देण्याची योजना आखण्यात आली आहे. मराठा समाज भवन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि स्मारक उभारण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्याकरिता अकरा लाख रुपये जमा झाले आहेत. या कार्याला सर्वांचा हातभर हवा आहे. मराठा समाजाचा समावेश 2 ए प्रवर्गात करण्याची मागणी सरकारकडे करीत असल्याचे सांगून ते म्हणाले, बेंगळूरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि बेळगांवमधील संगोळी रायण्णा पुतळा विटंबनेचा संकेश्वर मराठा समाज सोसायटीतर्फे तीव्र निषेध करीत आहोत. पुतळा विटंबना घटनेतील समाजकंटकांना शोधून त्यांना हद्दपार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सभेत समाजाचे उपाध्यक्ष एल. पी. शेंडगे, प्रकाश पाटील (मत्तीवडे), जयप्रकाश सावंत, योगशिक्षक बसवराज नागराळे, विष्णू जाधव, प्रकाश पाटील (शिपूर) श्रध्दा सावंत, पालक आणि विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, मधुकर माने, अभिजित कुरणकर, शिवाजी कळवीकट्टेकर, अविनाश नलवडे, सुभाष कासारकर, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, इंदुराव मोरे, रवि नार्वेकर, दिपक भिसे, महादेव क्षिरसागर, अंकले ग्रामपंचायत अध्यक्ष एकनाथ पोवार, राजेश गायकवाड, समीर पाटील अनेक मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार पुष्पराज माने यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वर बायपास रस्त्यावर वाहनांवर दगडफेक करून प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर बायपास रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास चालत्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *