संकेश्वर (महंमद मोमीन) : निवडणुकीतील पराजयाचा खेळाडूवृतीने स्विकार करीत आहे. प्रभागातील लोकांचा आर्शीवाद, पाठींबा लाभला. त्याबदल सर्व मतदारांना आपण धन्यवाद देत आहोत. विजय उमेदवार नंदू मुडशी यांचे अभिनंदन करीत आहे. वार्डातील लोक आपल्या पाठीशी ठाम उभे राहून सहकार्य केले आहेत. त्यामुळे वार्डातील कोणतीही समस्या असो, त्यांचे व्यक्तीगत काम त्यासाठी आपण सदासिध्द राहणार आहे. निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला आहे. आमचे लाडके नेते माजी मंत्री ए. बी. पाटील काॅंग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, वार्डातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिलांनी आपल्याला निवडणुकीत सर्वोतोपरी सहकार्य केले. त्यामुळे मी त्यांचा शतशः आभारी आहे. निवडणुकीचा निकाल काॅंग्रेसच्या बाजूने लागणार अशी आशा संकेश्वरकरांनी ठेवली होती. निकाल अनपेक्षित लागल्याने भ्रमनिराशा झाली आहे. वार्ड क्रमांक 13 काॅंग्रेसचा बालेकिल्ला आहे. तो निवडणूक निकालाने दुभंगणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta