Sunday , September 20 2026
Breaking News

मोदगा भावेश्वरी देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक

Spread the love

 

दड्डी : मोदगा (ता. हुक्केरी) येथील भावेश्वरी यात्रेनिमित्त नियोजन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रमुख उपस्थिती हुक्केरी तालुका तहसीलदार श्री. बलराम कट्टीमनी यांच्यासह यमकनमर्डी पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे 2, 3, 4 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी बैठक होती. बैठकीच्याअध्यक्षस्थानी भावेश्वरी देवी ट्रस्ट अध्यक्ष भाऊराव पाटील होते. प्रास्ताविक जनार्धन पाटील यांनी केले. या बैठकीत हुक्केरी तालुका ग्रामीण विद्युत सहसंघाचे स्टेशन ऑफिसर (ए इ) श्री. निरंजन मगदूम, जिल्हा पालकमंत्री यांचे स्विस सहाय्यक दयानंद पाटील, पीडब्ल्यूडी हुक्केरी प्रतिनिधी संदिप बी के व ग्रामपंचायत अध्यक्ष स्मिता कोकितकर, शरद पाटील, गीता बागडी, सुरेश अस्वले, ग्रामपंचायत पीडीओ संतोष कब्बगोळ, (पी एच सी) आरोग्य केंद्र कोट डॉ. वैभव जंबगी, एक्साईज बी एस कुरबीनट्टी व सहकारी, फायरब्रिगेड वाय जी कोलकार अधिकारी उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा नियोजक बैठक घेण्यात आली व कामाचा आढावा घेण्यात आला. तहसीलदार श्री. बलराम कट्टीमनी यांनी तालुक्यातील आलेल्या अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना दिल्या. येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य पाऊले उचलावीत, स्वच्छतेकडे लक्ष द्यावे तसेच 24 तास विद्युत सेवा पुरवठा, आरोग्य विषयी कोणतीही हलगर्जीपणा करू नये, ठिकठिकाणी पाण्याचा बंदोबस्त करा त्याबरोबरच ट्रॅफिक व पार्किंगची व्यवस्था, त्याचबरोबर दरवर्षीच्या बकऱ्यांचा बाजाराची जागा बदलेली आहे. गौळदेव मंदिर ह्या ठिकाणी खुल्या जागेत केली आहे याची व्यापाऱ्यांनी दखल घ्यावी, असे भावेश्वरी ट्रस्ट अध्यक्ष भाऊराव पाटील यांनी सांगितले. या बैठकीमध्ये भावकाई देवी पाटील ट्रस्ट मोदगे सचिव संतराम पाटील, सुधाकर पाटील, चंद्रकांत पाटील, भागोजी पाटील, मारुती पाटील, विजय पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार जनार्धन पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *