संकेश्वर (महंमद मोमीन) : निगसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा ७९ वा वाढदिवस भक्तगणांनी भक्तीपूर्वक साजरा केला. निडसोसी श्री दुरदुंडीश्वर मठात बहुसंख्य भक्तगणांनी श्रींचा आर्शीवाद घेऊन शुभेच्छा प्रदान केल्या. संकेश्वर वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्रातर्फे परमपूज्य महास्वामीजींना शैक्षणिक साहित्य देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी वंदेमातरम योग प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश करजगी, उपाध्यक्ष अजय सारापूरे, विठ्ठल ढोळेण्णावर, गुंडू नाईकमनी, किर्तीकुमार संघवी, किरण नेसरी, पिंटू पाटील. योग साधक उपस्थित होते. दरम्यान श्रींना पुष्पहार अर्पण करून सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहण नेसरी, महेश देसाई, प्रदीप माणगांवी, सागर जकाते, संतोष कमनुरी, मलप्पा रवदी तसेच अनेक मान्यवरांनी भक्तगणांनी श्रींचा आर्शीवाद घेऊन शुभेच्छा प्रदान केल्या. सर्व स्तरातून गेल्या दोन दिवसांपासून भक्तगणांकडून श्रींना शुभेच्छा प्रदान केल्या जात आहेत.
