संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील समस्या जाणून घेण्यासाठी नुकताच माजी खासदार रमेश कत्ती यांनी पहाणी दौरा केला. गावातील रस्त्याची दुरवस्था, गटारीत सांडपाणी तुंबून राहिलेले, गावत सगळीकडे अस्वच्छतेचे रडगाणे ऐकून रमेश कत्ती चांगलेच संतप्त झाले. त्यांनी सत्तारुढ नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली. गावातील मूलभूत समस्या सोडविण्यात नगरसेवक कमी पडल्याची खंत व्यक्त करुन पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी आर. बी. गडाद यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी लागलीच गावातील रस्ते पॅचवर्क कामाला चालना मिळवून दिली. त्याचबरोबर गटार स्वच्छतेचे काम आणि आवश्यकतेनुसार गटार निर्माणचे काम हाती घेण्याची सूचना केली. माजी खासदार रमेश कत्ती यांच्या संकेश्वर पहाणी दौऱ्यानंतर गावातील रस्ते पॅचवर्कचे काम होताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार गटार निर्माणचे काम देखील केले जात आहे. गावतील स्वच्छतेच्या कामात सफाई कामगार मग्न दिसताहेत. संकेश्वरकरांच्या मूलभूत समस्या जाणून घेऊन सोडविण्याचे कार्य केलेबदल रमेश कत्ती यांना लोकांतून धन्यवाद दिले जात आहेत. संकेश्वरच्या पहाणी दौऱ्यात रमेश कत्ती यांच्या समवेत बेळगांव जिल्हा बॅंकेचे संचालक गजानन क्वळी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक रोहण नेसरी, नंदू मुडशी, प्रदीप माणगांवी, संतोष कमनुरी नागरिक सहभागी झाले होते.
