संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पोलिसांनी गौरव्वा मर्डरचा तपास ताबडतोब लावून मारेकरी नगरसेवक उमेश रमेश कांबळे आणि त्याच्या दोघां साथीदारांना जेरबंद करण्याचे कार्य केल्याबद्दल संकेश्वर नागरिकांतून पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी व पोलीस कर्मचारींचे विशेष अभिनंदन केले जात आहे.
तो मी नव्हेच
गौरव्वाच्या पाठीत गावठी पिस्तूलने गोळ्या झाडून हत्या करणारा नगरसेवक उमेश रमेश कांबळे गौरव्वाचा मर्डर करुन तो मी नव्हेच.. या अविर्भावात घटना घडलेल्या कांही तासांत गावात फिरताना दिसून आल्याचे सांगितले जात आहे. मर्डर केल्यानंतर कांही वेळात उमेशने देवदर्शन घेतल्याची जोरदार चर्चा केली जात आहे. त्यांने देवाकडे देवा मला माफ कर..अशीच काहीशी प्रार्थना केल्याचे समजते. रविवारी घटनेनंतर तो अनेकांना भेटून नमस्कार चमत्कार केल्याचे लोक सांगताहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर देखील तो बिनधास्त दिसला आहे.
दोन महिन्यांचं राशन
उमेशच्या घरातील सदस्यांना उमेशचं अलिकडचे वागणे कोड्यात टाकणारे ठरले होते. त्यांने घरात दोन महिन्यांचं राशन आणून कशासाठी ठेवलं, तो गुमसूम का राहत होता. याचे उत्तर घरातील लोकांना तो पोलिसांच्या हाती लागल्यानंतर मिळाले. तोपर्यत फार उशीर झाला होता.
सीसीटीव्हीत कैद
संकेश्वर पोलिसांना मर्डर प्रकरणाचा तपास लावण्यात सीसीटीव्ही फुटेज अतिशय उपयुक्त ठरले आहेत. फुटेजमध्ये त्या दिवशी त्या वेळेला गौरव्वाच्या घरातून उमेश तोंडाला रुमाल बांधून घराबाहेर पडताना दिसून आला आहे. संकेश्वर पोलिसांनी लागलीच उमेश याची चौकशी करत त्याला गजाआड करण्याचे काम केले आहे.