Wednesday , November 29 2023
Breaking News

श्री शंकरलिंग रथोत्सव अखंडपणे : श्री शंकराचार्य

Spread the love

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाची प्रतिवार्षिक श्री शंकरलिंग रथोत्सव यात्रा अखंडपणे चालली आहे. यंदाही रथोत्सव यात्रा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आल्याचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सांगितले. स्वामीजींनी पत्रकारांचा सन्मान करुन आपले मनोगत व्यक्त केले. श्री पुढे म्हणाले, यंदा यात्रा होणार की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. श्री शंकराचार्य कृपेने यात्रोत्सव सर्व धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडली आहे. कोरोनाच्या संकट काळात देखील यात्रोत्सवात कसलीच बाधा निर्माण झालेली नाही. रथोत्सव यात्रा गेल्या पाचशे वर्षांपासून अखंडपणे चालू आहे. संकेश्वर श्री सिध्द सांख्येश्वर हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे आजपावेतो मठाच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांत कसलीच अडचण निर्माण झालेली नाही. यंदा देखील भक्तगणांना यात्रोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करता आलेली आहे.

पत्रकारांचे कार्य स्तुत्य

संकेश्वरचे पत्रकार हे निस्वार्थीपणाने कार्य करणारे आहेत. श्री शंकराचार्य संस्थान मठाच्या सर्वच कार्यक्रमांत पत्रकारांचा सिंहांचा वाटा राहिला आहे. त्यांचे कार्य स्तुत्य असल्याचे श्रींनी सांगितले. यावेळी श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या हस्ते पत्रकार एम. बी. गस्ती, महंमद मोमीन, आनंद शिंदे, बाबूराव हलगडगी, विलास घोरपडे, सचिन कांबळे, आनंद बोम्मण्णावर, पांडूरंग पाटील, सर्जेराव गायकवाड, तेजप्रभु गडकरी, गजानन नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विरुपाक्ष मलकट्टी, गणपा पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

एटीएम मशीनला आग; रोख रक्कम जळून खाक

Spread the love  हुक्केरी : एटीएम मशीनला अचानक लागलेल्या आगीत रोख रक्कम जळून खाक झाली. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *