संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात आज श्रीरामसेना आणि भारतीय नवनिर्माण सेनेतर्फे व्हॅलेंटाईन डे ला तीव्र विरोध दर्शविणेत आला. येथील कॅफे सेंटर आणि चायनिज सेंटरवर जाऊन सेनेच्या पदाधिकारींनी व्हॅलेंटाईन डे नको, शहीद दिवस आचरण्यात आणण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्रीरामसेना हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर म्हणाले, भारतीय संस्कृतीत व्हॅलेंटाईन डे चा कोठेच उल्लेख नाही. त्यामुळे प्रेमीयुगुलांनी तो साजरा करण्याचे कार्य करु नये. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामाच्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या जवानांची आठवण म्हणून हा दिवस शहीद दिन म्हणून आचरणेत आणण्याचे कार्य होण्याची आवश्यकता आहे. विदेशी नकली दिवस साजरा न करता आजचा दिवस पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली वाहून शहीद दिन म्हणून आचरणेत आणण्याचे कार्य प्रत्येकाकडून होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भारतीय नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विकास ढंगे, राजशेखर गस्ती, महेश गुडशी, नागराज कणगली, सागर बेळकुडे उपस्थित होते.