Sunday , July 26 2026
Breaking News

श्री समादेवी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात, उद्या महाप्रसाद

Spread the love

बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्य वाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या श्री समादेवी जन्मोत्सवाचा सोमवारी मुख्य दिवस होता. त्यानिमित्त सकाळी चौघडा वादन व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी सात ते अकरा श्री समादेवीला विविध फळं, सुखा मेवा, पंचामृत, दही व हळदीच्या पाण्यानी महाभिषेक करण्यात आला.
रविवारी संध्याकाळी बेळगाव दक्षिण विभागाचे आ. अभय पाटील यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी अभय पाटील समाजाला मार्गदर्शन करताना म्हणाले की सरकारने विविध समाजातील मंदिरासाठी आर्थिक योजना आखल्या आहेत. याचा लाभ घेण्यासाठी समाजाच्या कार्यकारी मंडळानी पुढाकार घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.
सोमवारी संध्याकाळी 3 वाजता पुराण वाचन झाले. त्यानंतर 4 वाजता श्रीची पालखी प्रदक्षिणाला सुरुवात झाली. पाचवी प्रदक्षिणा मंदिरा पासून प्रारंभ होऊन समादेवी गल्ली गोंधळी गल्ली गवळी गल्ली गल्ली येथून श्री समादेवी मंदिर येथे सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *