संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी विधानसभा आखाड्यात उतरणार आणि विजयी होणार यात तीळमात्र शंका नसल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, हुक्केरी विधानसभा जिंकणे हे आपले लक्ष्य आहे. गेल्या निवडणुकीत मतदारांनी आशीर्वाद केला होता पण बॅडलक आपल्याला पराभव पत्करावा लागला. 2023 ची निवडणूक तशी मोठी लक्षवेधी ठरणार आहे. यात आपण सर्व तयारीनिशी उतरणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार कोण राहिले तरी विजय आपलाच राहणार आहे. विद्यमान आमदार उमेश कत्ती यांच्याविषयी लोकांत असणारी नाराजी हेच आपले प्लस पॉइंट राहणार आहे. आपण कोणावर टीका करणार नाही. आपण काय करणार ते मतदारांना सांगून त्यांचा आशीर्वाद मिळविणार आहे. ए. बी. पाटील निवडणुकीत रिंगणात उतरणार नाहीत. या भ्रमात राहू नका. कारण निवडणूक लढविणेचा आपला निर्धार नक्की आहे.
भाजपात जाणार काय? पत्रकारांनी ए. बी. पाटील यांना भाजपात जाणार काय? असा प्रश्न विचारला असता स्मित हास्य करीत त्यांनी यावर उत्तर देणे टाळले आहे. त्याअर्थी ए. बी. काॅंग्रेसमध्ये राहणार की भाजपात उडी घेणार याविषयी कार्यकर्तेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला दिसतो आहे. ए. बी. पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले तर कत्तींना झुंज द्यावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
