संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित बीबीए काॅलेजचा बॅडमिंटनपटू अप्पासाहेब रशीद लाडखान यांने नुकतेच धारवाड येथे पार पडलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंगल अंडर-19 प्रथम क्रमांक तर मिक्स डबल बॅडमिंटन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविलेबदल एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी त्याचे विशेष अभिनंदन करुन सन्मानित केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री ए. बी. पाटील म्हणाले आमच्या शिक्षण संस्थेचे विद्यार्थी क्रिडा स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहेत. आमच्या बीबीए काॅलेजचा विद्यार्थी अप्पासाहेब लाडखान बॅडमिंटन स्पर्धेत मोठं यश संपादन करणारा ठरला आहे. त्याला ऑल इंडिया स्टुडंट स्पोर्ट्स ॲवॉर्ड्स’, नॅशनल ॲवॉर्ड्, बेंगळूर येथे पार पडलेल्या राष्ट्रस्तरीय ऑल इंडिया स्पोर्ट्स चॅंपियनशिप स्पर्धेत तो सिंगल अंडर-19 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. न्यू दिल्ली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एशियन गेम्स करिता त्याची निवड झाली आहे. बॅडमिंटन स्पर्धेसाठी त्याला संघातर्फे सर्वोतोपरी सहाय्य सहकार्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एसडीव्हीएस शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. ए. पुजारी बीबीए काॅलेजचे प्राचार्य डॉ. महेशगौडा पाटील यांनी बॅडमिंटनपटू अप्पासाहेब लाडखान यांचे विशेष अभिनंदन केले आहे.