Saturday , August 8 2026
Breaking News

मुदत संपली तरी असोगा रेल्वे गेट बंदच, प्रवाशांचे हाल

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव- लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण काम युध्दपातळीवर सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील खानापूर रेल्वेस्थानकावर जवळ असलेल्या असोगा रेल्वे गेटचे दुरूस्तीचे काम दि. २२ पर्यंत संपवून देतो. व असोगा रेल्वे गेट वाहतुकीस मोकळे करतो, असे आश्वासन रेल्वे खात्याचे इंजनियर श्री. शशिधर यांनी असोगा भागातील जनतेला दिले होते. मात्र दुरूस्तीच्या कामात दुर्लक्ष होत असल्याने दिलेली तारीख संपली. त्यामुळे असोगा परिसरातील जनतेतून नाराजी पसरली आहे.
असोगा भागातील जनतेला कामानिमित्त खानापूर, बेळगावला ये-जा करावे लागते. याची गैरसोय होत आहे. या भागातील असोगा, मन्सापूर, भोजगाळी, कुन्टीनोनगर, मणतुर्गा, नेरसा, बाचोळी आदी गावच्या नागरिकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे.
गेल्या १० ते १२ दिवसापासूनन हा मार्ग बंदच आहे. यासाठी संबंधित खात्याचे अभियंते शशिधर यांनी ८ दिवसात असोगा रेल्वे गेट वाहतुकीस मोकळे करून देतो, असे सांगूनही अजून असोगा रेल्वे गेट बंदच आहे. यामुळे या भागातील जनतेचे हाल होत आहेत. तेव्हा लवकरात लवकर असोगा रेल्वे गेट वाहतुकीस मोकळे करावे व असोगा परिसरातील जनतेचे हाल दुर करावे, अशी मागणी नागरिकांतून तसेच वाहनधारकातून होत आहे.
यावेळी भाजपचे नेते राजेंद्र रायक्का यांनी इंजिनिअर श्री. शशिधर यांच्याशी संपर्क साधुन असोगा रेल्वे गेटचे दुरूस्तीचे काम लवकर संपवून वाहतुकीला मोकळे करावे, अशी विनंती केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिकूल परिस्थितीतही मराठी शाळांच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : आबासाहेब दळवी

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढते स्थलांतर, बदलती सामाजिक परिस्थिती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *