Tuesday , March 3 2026
Breaking News

पीव्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवले पहिले सुवर्ण

Spread the love

 

बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये 22वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये 28 जुलैपासून सुरू झालेली ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू सिंधूने धडाकेबाज कामगिरी केली आहे. सिंधूने महिला एकेरीचे विजतेपद पटकावले आहे. त्यामुळे बॅटमिंटनमध्ये भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळाले आहे.
कॅनडाची मिशेल ली आणि भारताची पीव्ही सिंधू यांच्यादरम्यान महिला एकेरीचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात सिंधून मिशेल लीचा 21-15, 21-13 अशा फरकाने पराभव केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सिंधूचे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी, 2014 मध्ये ग्लासगो येथे आणि 2018मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धांमध्ये तिने अनुक्रमे कांस्य आणि रौप्यपदक पटकावले होते.
रविवारी (7 ऑगस्ट) झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील सामन्यात पीव्ही सिंधूने जबरदस्त खेळ दाखवला होता. तिने सिंगापूरच्या वाई जिया मिनचा 21-19, 21-17 असा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. सिंगापूरची खेळाडू जिया मिनने सिंधूला कडवी झुंज दिली होती.

About Belgaum Varta

Check Also

भारताच्या लेकींनी ‘जग जिंकलं’; द. आफ्रिकेला हरवून भारत अजिंक्य!

Spread the love  मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या महिला विश्वचषकातील अंतिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *