नवी दिल्ली : भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये आपला दमदार फॉर्म कायम ठेवत महिला एकेरी गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारलीय. दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणाऱ्या सिंधुनं शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हि बिंग जियाओला पराभूत केलं. हि बिंग जियाओ विरुद्ध पीव्ही सिंधुनं 21-9, 13-21, 21-19 असा विजय मिळवलाय.
सिंधूनं 2014 मध्य कांस्यपदक जिंकलं होतं. तिनं एक तास 16 मिनिटं चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित चिनी खेळाडूचा 21-9, 13-21, 21-19 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूचा सामना जिंकण्याचा विक्रम बिंग जियाओविरुद्ध ७-९ असा होता, जिला तिनं मागील दोन सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अकानं यामागुचीशी होईल, जिनं थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगचा 9-21, 21-15, 21-17 असा पराभव केलाय.
सिंधूनं वेळ न गमावता पहिल्या गेममध्ये 11-2 अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर पहिला गेम जिंकत पहिल्या सेटमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. ब्रेकपर्यंत तिनं ही आघाडी 11-10 अशी नेली. ब्रेकनंतर चीनच्या खेळाडूनं सलग पाच गुण मिळवत 19-12 अशी आघाडी घेतली. सिंधूला येथून पुनरागमन करता आलं नाही आणि तिनं दुसरा गेम जिंकला आणि सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधून तिसऱ्या गेममध्ये प्रवेश केला.
Check Also
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
Spread the love इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंग्लंड …