नवी दिल्ली : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखपतीमुळे विश्वचषकाला मुकणार आहे. जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली असून तो विश्वचषकाला मुकणार आहे. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, दुखापतीमुळे अष्टपैलू रवींद्र जाडेजा विश्वचषकाला मुकला आहे. त्यात आता आणखी एका महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दरम्यान, बीसीसीआयनं जसप्रीत बुमराहबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही. पीटीआयनं बीसीसीआयमधील सुत्रांच्या हवाल्यानं जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकाला मुकणार असल्याचं वृत्त दिलं आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यापूर्वी सराव करताना जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली, ज्यामुळं संघ व्यवस्थापनानं बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. दुखापतींशी झुंजणाऱ्या जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतून संघात पुनरागमन केलं होतं. त्याची दुखापत किरकोळ असल्याचं बीसीसीआयनं बुधवारी स्पष्ट केलं होतं. पण जसप्रीत बुमराहची दुखापत जास्त गंभीर असल्याचं आज समोर आलेय.
Belgaum Varta Belgaum Varta