सिल्हेट : महिला आशिया चषकातील अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाने विजयी षटकार खेचत भारताने आशिया चषक जिंकला. तब्बल आठ गडी राखून श्रीलंकेचा दारूण पराभव केला. 25 चेंडूत 50 धावांची खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. रेणुका सिंगने 3 षटकात 3 गडी बाद केले तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर अष्टपैलू कामगिरीसाठी दीप्ती शर्माला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताने लंकेचे 66 धावांचे आव्हान पार करताना आक्रमक सुरूवात केली. सलामीवीर स्मृती मंधानाने आक्रमक फटकेबाजी करत भारताला 3 षटकात 25 धावांपर्यंत पोहचवले. मात्र लंकेनेही भारताला पाठोपाठ दोन धक्के दिले. झुंजार फलंदाजी करणार्या श्रीलंकेच्या रणवीराने गोलंदाजीतही चमक दाखवत भारताला पहिला धक्का दिला. तिने 8 चेंडूत 5 धावा करणार्या शेफाली वर्माला पॅव्हेलियनमध्ये धाडले. कविशा दिलहारीने भारताला दुसरा धक्का दिला. इन फॉर्म जेमिमाह रॉड्रिग्जचा 2 धावांवर त्रिफळा उडवला.
तत्पूर्वी, श्रीलंकेची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. पहिल्या पॉवर प्ले मध्ये श्रीलंकेचा निम्मा संघ माघारी परतला होता. एका क्षणी 50 धावा तरी होतील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजीसमोर एकही फलंदाज टिकू शकला नाही. श्रीलंकेकडून फक्त दोघीनाच दोन आकडी संख्या गाठता आली. इनोका रणविरा आणि ओधाडी रणसिंघे यांनी अनुक्रमे 18 आणि 13 धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर स्नेह राणा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी तिला साथ देत प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Belgaum Varta Belgaum Varta