ऍडलेड : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना आज भारत आणि इंग्लंड असा रंगणार आहे. ऑस्ट्रेलियातील ऍडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. एकीकडे पाकिस्तानने न्यूझीलंडला मात देत फायनलमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. दरम्यान फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं असून त्यामुळेच या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड हे दोघेही ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेडमध्ये आमनेसामने येणार आहेत. ऍडलेडची खेळपट्टी फलंदाजीच्या दृष्टीने चांगली मानली जाते. पण सोबतच गोलंदाजांनाही फायदा मिळू शकतो. येथे पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 180 आहे, इतर मैदानांच्या तुलनेत ही बरीच जास्त आहे. फलंदाजांनी चांगली सुरुवात केल्यास ते सहज मोठी धावसंख्या उभारु शकतात. पण गोलंदाजही सुरुवातीच्या षटकातच विकेट्सची आशा करतील. ऍडलेड ओव्हलचे मैदान मोठे असल्याने गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.
Belgaum Varta Belgaum Varta