नवी दिल्ली : टी-20 वर्ल्डकप 2022 स्पर्धा ऑस्ट्रेलियात पार पाडली. मेलबर्न येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानवर 5 विकेटनी विजय मिळवत दुसर्या विजेतेपदावर नाव कोरले. इंग्लंडने याआधी 2010 साली विजेतेपद मिळवले होते.
अंतिम सामना झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने टी-20 वर्ल्डकप 2022च्या सर्वोत्तम संघाची घोषणा केली आहे. या संघात 12 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आयसीसीच्या या वर्ल्डकप संघात सर्वाधिक 4 खेळाडू इंग्लंडचे आहेत. तर 12व्या खेळाडूसह भारताचे 3 खेळाडू आहेत. पाकिस्तानच्या 2 तर न्यूझीलंड, द.आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीच्या या संघात सलामीवीर म्हणून जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांची निवड करण्यात आली आहे. या दोघांनी इंग्लंडला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमीका बजावली होती. या संघाचे कर्णधारपद देखील बटलरकडे देण्यात आले आहे. संघात तिसर्या क्रमांकावर विराट कोहली आहे. ज्याने स्पर्धेत 6 डावात 4 अर्धशतकासह सर्वाधिक धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आहे. ज्याने तुफान फलंदाजी करत सर्वांचे मन जिंकले.
पाचव्या स्थानावर न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सचे नाव आहे. ज्याने एका शतकासह 201 धावा केल्या. झिम्बाब्वेच्या सिकंदर रजाला सहावे स्थान दिले गेले आहे. रजाच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केला होता.
आयसीसीच्या संघात सातव्या स्थानावर पाकिस्तानचा शादाब खान असून त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी केली. आठव्या स्थानावर इंग्लंडचा सॅम करन आहे. सॅमने मालिकावीर पुरस्कार देखील पटकावला आहे. नवव्या स्थानावर द.आफ्रिकेचा एनरिक नोर्जे आहे. 10व्या क्रमांकावर इंग्लंडचा मार्ग वुड दर 11व्या स्थानावर शाहीन शाह आफरीदीचा समावेश केला गेलाय. 12वा खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याचा समावेश केला गेलाय.
Belgaum Varta Belgaum Varta