मुंबई : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि वन-डे संघांची घोषणा झाली आहे. मात्र,पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी संघाची निवड अद्याप हाेणे बाकी आहे. आयपीएल 2023 मध्ये आपल्या धमाकेदार फलंदाजीने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणार्या रिंकू सिंगची टीम इंडियाच्या टी20 संघात निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामात आपल्या धमाकेदार फलंदाजीमुळे रिंगू सिंग प्रसिद्धीझोतात आला आहे. आयपीएलमधील साखळी सामन्यात त्याने शेवटच्या षटकात पाच षटकार फटकावत केकेआरला अविश्वसनीय विजय मिळवून दिला होता.
एका रिपोर्टनुसार, भारतीय निवडकर्त्यांनी रिंकूला आयपीएल 2023 मधील दमदार कामगिरीसाठी बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिंकूची विंडीज दौऱ्यासाठी टी20 संघात निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रिंकूने ‘आयपीएल’मधील 14 सामन्यांत 59.25 सरासरीने आणि 149.52 च्या स्ट्राइक रेटने ४७४ धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीची दखल घेत त्याचा टीम इंडियाच्या टी20 संघात समावेश हाेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta