मुंबई : भारताचा माजी अष्टपैलू अजित आगरकरला चीफ सिलेक्टर बनवले जाऊ शकते. वास्तविक, तो या पदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे समजते आहे. सध्या चीफ सिलेक्टरची जबाबदारी शिव सुंदर दास सांभाळत आहे. मात्र लवकरच बीसीसीआय नव्या चीफ सिलेक्टरची निवड जाहीर करण्याची दाट शक्यता आहे.
चेतन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर चीफ सिलेक्टर हे पद रिक्त आहे. बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवेल आहेत. नुकतीच याबाबत ट्विटरवरून घोषणा करण्यात आली होती. त्या आधी वीरेंद्र सेहवागशी चीफ सिलेक्टर पदासाठी संपर्क साधण्यात आल्याची बातमी समोर आली होती, परंतु माजी सलामीवीराने हे वृत्त नाकारले होते.
दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, क्रिकेटर अजित आगरकर हा बीसीसीआयच्या नव्या चीफ सिलेक्टर शर्यतीत आघाडीवर आहे. याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती बीसीसीआयने दिली नसली तरी आगरकरची निवड होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta