Friday , November 22 2024
Breaking News

वर्ल्डकप सामन्यांच्या वेळेत मोठा बदल

Spread the love

 

मुंबई : आयसीसी वन-डे वर्ल्डकप 2023चे यजमान पद भारताला मिळाले आहे. या स्पर्धेची सुरुवात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना दि. ५ ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. आयसीसीने मंगळवारी (दि.२७) ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले.

भारतातील १० शहरांमध्ये ४६ दिवस एकूण ४८ सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सामन्यांच्या वेळाही समोर आल्या आहेत. दिवसाचे सामने सकाळी १०.३० वाजता, तर दिवस-रात्रीचे सामने दुपारी २ वाजता सुरूवात होणार आहे. स्पर्धेमध्ये शनिवारी डबलहेडर तर रविवारी एक सामन्याची मेजवानी क्रिकेटप्रमींना चाखायला मिळणार आहे.अंतिम लीग स्टेजचे सामने वगळता डबलहेडर रविवारी खेळले जातील आणि शनिवारी एकच सामना खेळवण्यात येणार आहे.

स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये दि.१९ नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर २० नोव्हेंबर सामन्यासाठी राखीव दिवस आहे. तीनही बाद फेरीचे सामने दिवस – रात्र खेळवण्यात येणार आहेत. साधारणपणे भारतात दुपारी अडीच वाजल्यापासून डे नाईटचे सामने खेळवले जातात.

मात्र, यंदाच्या आयसीसी वन-डे वर्ल्डकपमध्ये भारतातील थंड वातावरणामुळे डे-नाईटचे सामने अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहेत. यजमान भारतीय संघ स्पर्धेची सुरूवात ५ वेळा वर्ल्डकप विजेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध करणार आहे. हा सामनादि. ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे खेळवण्यात येणार आहे.

सेमीफायनल, फायनलसाठी राखीव दिवस
वर्ल्डकपच्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. उपांत्य आणि अंतिम सामन्याच्या दिवशी पाऊस पडल्यास सामना राखीव दिवशी आयोजित करण्यात येणार आहे.

वन-डे वर्ल्डकपचा पहिला उपांत्य सामना दि. १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आणि दुसरा सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवण्यात येणार आहे. तर स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमध्ये दि. १९ नोव्हेंबरला होणार आहे. तर दि. २० नोव्हेंबर हा अंतिन सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

आयसीसीच्या अध्यक्षपदी जय शाह यांची बिनविरोध निवड

Spread the love  नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *