नवी दिल्ली : विश्वचषक 2023 चे मंगळवारी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासोबत या हाय-व्होल्टेज स्पर्धेची तयारी करणार आहे. यानंतर आशिया कपही होणार आहे. मात्र यादरम्यान टीम इंडियाला आणखी एक मालिका खेळायची आहे. ही टी-20 मालिका असली तरी त्यात हार्दिक पंड्या नेतृत्व करताना दिसणार आहे.
आशिया कपपूर्वी आणि वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडिया 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेला आयर्लंड क्रिकेट बोर्डानेच दुजोरा दिला आहे. तिन्ही सामने 18 ते 23 ऑगस्ट दरम्यान मालाहाइड येथे खेळवले जाणार आहेत.
टीम इंडियाने यापूर्वी दोन सामन्यांचा टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकून यजमान आयर्लंडचा 2-0 ने धुव्वा उडवला होता. त्यावेळी हार्दिक पंड्याने संघाचे नेतृत्व केले होते आणि यावेळीही तोच कर्णधार असेल अशी दाट शक्यता आहे.
भारत विरुद्ध आयर्लंड टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामना : 18 ऑगस्ट
दुसरा सामना : 20 ऑगस्ट
तिसरा सामना : 23 ऑगस्ट